मुंबई - विधान भवन (Vidhan Parishad) परिसरातील बेस्टच्या बसमध्ये (Best Bus) एक संशयित बॅग आढळल्याची घटना (Unclaimed Bag Found) आज (8 डिसेंबर) सायंकाळी साडेआठच्या सुमारास उघड झाली. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. चालकाकडून मुंबई पोलिसांना (Mumbai Police) फोन करून या बॅगबाबत माहिती देण्यात आली. मुंबई पोलीस ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला. तपासादरम्यान बॅगमध्ये काहीही आढळून आले नाही.
हेही वाचा -Army Helicopter Crash LIVE Updates : हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशाचे पहिले CDS बिपीन रावत यांचे निधन, कॅप्टन वरुण सिंह जखमी
- तपासात बॅगमध्ये काहीच आढळले नाही -
सीएसटीवरून मंत्रालयाकडे येणाऱ्या बेस्टच्या बस MH 01 DR 2934 गाडीमध्ये चालकाला संशयित बॅग आढळल्याने बस चालकाने मुंबई पोलिसांना संपर्क केला. विधान भवन परिसरातील स्टॉपवर मुंबई पोलिसांकडून डॉग स्कॉड, बॉम्ब शोधक पथककडून पाहणी करण्यात आली. त्यानंतर बॅगमध्ये काहीही नसल्याचे निष्पन्न झाले आहे.
- बेस्टच्या बसमघ्ये आढळली बॅग -
बेस्टच्या बस क्र. एमएच 01 DR 2934 मध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती, मात्र, नंतर बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी पोहोचून बॅग तपासली असता त्यात सुताराचे सामान आढळून आली आहे. बॉम्ब असल्याची माहिती खोटी ठरली आहे. पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा -Bipin Rawat passes away : सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन