महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोना काळात मुंबईत अनधिकृत बांधकामे, 9558 पैकी 466 बांधकामावर कारवाई

कोरोनामुळे लॉकडाऊन लागला. उद्योग धंदे बंद झाले. लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मात्र याच दरम्यान मुंबईत भूमाफियांनी अनधिकृत बांधकामे केल्याचे उघड झाले आहे.

By

Published : Mar 13, 2021, 1:19 AM IST

Unauthorized constructions in Mumbai during the Corona period
कोरोना काळात मुंबईत अनधिकृत बांधकामे

मुंबई - कोरोनामुळे लॉकडाऊन लागला. उद्योग धंदे बंद झाले. लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मात्र याच दरम्यान मुंबईत भूमाफियांनी अनधिकृत बांधकामे केल्याचे उघड झाले आहे. 25 मार्च 2020 ते 25 फेबुवारी 2021 पर्यंत तब्बल 9 हजार 558 अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली, त्यापैकी 466 अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिल्याचे आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी सांगितले.

कोरोना काळात मुंबईत अनधिकृत बांधकामे

पालिकेने दिली ही माहिती -

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी महापालिकेच्या अतिक्रमण व निर्मुलन शहरे कार्यालयाकडे ऑनलाईन तक्रार प्रणालीवर अनधिकृत बांधकामाबाबत किती तक्रारी नोंद झाल्या, तसेच किती अनधिकृत बांधकामाला नोटीस देण्यात आल्या याची माहिती मागवली होती. त्यावर 25 मार्च 2020 पासून 28 फेबुवारी 2021 पर्यंत ऑनलाईन तक्रार प्रणालीवर एकूण 13 हजार 325 तक्रारी नोंद झाल्या. त्यात 3 हजार 767 दुबार तक्रारी नोंद आहेत. 9 हजार 558 तक्रारी अनधिकृत बांधकामाच्या आहेत. त्यापैकी फक्त 466 अनधिकृत बांधकामावर निष्कासन कार्यवाही झाली आहे. सर्वात जास्त म्हणजेच 3 हजार 251 तक्रारी कुर्ला येथील एल विभागात नोंद झाल्या आहेत.

तर कारवाई का नाही -

शिवसेना बदल्याच्या भावनेने अभिनेत्री कंगना राणावतच्या अनधिकृत बांधकामावर मुंबई महानगरपालिका कार्यवाही करते. अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी पालिका पोलीस बंदोबस्त आणि इतर साधनांवर दरवर्षी 20 कोटी रुपये खर्च करते. तरीही मुंबईत लाखो अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत त्यावर पालिका का कारवाई करत नाही, अनधिकृत बांधकाम प्रकरणी किती अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असे प्रश्न शकील शेख यांनी उपस्थित केले आहेत.

कोणत्या विभागात किती कारवाई -

  • ए विभागात एकूण 32 तक्रार, 8 दुबार तक्रार, 24 अनधिकृत बांधकाम, फक्त 1 निष्कासन कारवाई.
  • बी विभागात एकूण 368 तक्रार, 186 दुबार तक्रार, 182 अनधिकृत बांधकाम, फक्त 2 निष्कासन कारवाई.
  • सी विभागात एकूण 614 तक्रार, 225 दुबार तक्रार, 389 अनधिकृत बांधकाम, फक्त 24 निष्कासन कारवाई.
  • डी विभागात एकूण 151 तक्रार, 73 दुबार तक्रार, 78 अनधिकृत बांधकाम, फक्त 15 निष्कासन कारवाई.
  • ई विभागात एकूण 579 तक्रार, 143 दुबार तक्रार, 436 अनधिकृत बांधकाम, तसेच एकही निष्कासन कारवाई झाली नाही
  • एफ नॉर्थ विभागात एकूण 148 तक्रार, 58 दुबार तक्रार, 90 अनधिकृत बांधकाम, फक्त 9 निष्कासन कारवाई.
  • एफ साऊथ विभागात एकूण 297 तक्रार, 83 दुबार तक्रार, 214 अनधिकृत बांधकाम, फक्त 3 निष्कासन कारवाई.
  • जी नॉर्थ विभागात एकूण 203 तक्रार, 23 दुबार तक्रार, 180 अनधिकृत बांधकाम, फक्त 7 निष्कासन कारवाई.
  • जी साऊथ विभागात एकूण 212 तक्रार, 90 दुबार तक्रार, 122 अनधिकृत बांधकाम, फक्त 15 निष्कासन कारवाई.
  • एच ईस्ट विभागात एकूण 451 तक्रार, 219 दुबार तक्रार, 232 अनधिकृत बांधकाम, फक्त 11 निष्कासन कारवाई.
  • एच वेस्ट विभागात एकूण 525 तक्रार, 96 दुबार तक्रार, 429 अनधिकृत बांधकाम, फक्त 21 निष्कासन कारवाई.
  • के ईस्ट विभागात एकूण 441 तक्रार, 46 दुबार तक्रार, 395 अनधिकृत बांधकाम, फक्त 33 निष्कासन कारवाई.
  • के वेस्ट विभागात एकूण 342 तक्रार, 40 दुबार तक्रार, 302 अनधिकृत बांधकाम, फक्त 58 निष्कासन कारवाई.
  • एल विभागात एकूण 3251 तक्रार, 1249 दुबार तक्रार, 2002 अनधिकृत बांधकाम, फक्त 52 निष्कासन कारवाई.
  • एम ईस्ट विभागात एकूण 1194 तक्रार, 20 दुबार तक्रार, 1174 अनधिकृत बांधकाम, फक्त 8 निष्कासन कारवाई.
  • एम वेस्ट विभागात एकूण 1213 तक्रार, 526 दुबार तक्रार, 687 अनधिकृत बांधकाम, फक्त 33 निष्कासन कारवाई.
  • एन विभागात एकूण 280 तक्रार, 40 दुबार तक्रार, 240 अनधिकृत बांधकाम, फक्त 4 निष्कासन कारवाई.
  • पी नॉर्थ विभागात एकूण 429 तक्रार, 87 दुबार तक्रार, 342 अनधिकृत बांधकाम, फक्त 62 निष्कासन कारवाई.
  • पी साऊथ विभागात एकूण 416 तक्रार, 183 दुबार तक्रार, 233 अनधिकृत बांधकाम, फक्त 4 निष्कासन कारवाई.
  • आर नॉर्थ विभागात एकूण 595 तक्रार, 90 दुबार तक्रार, 505 अनधिकृत बांधकाम, फक्त 14 निष्कासन कारवाई.
  • आर साऊथ विभागात एकूण 348 तक्रार, 34 दुबार तक्रार, 314 अनधिकृत बांधकाम, सर्वात जास्त 75 निष्कासन कारवाई.
  • आर सेंट्रल विभागात एकूण 398 तक्रार, 202 दुबार तक्रार, 196 अनधिकृत बांधकाम, फक्त 4 निष्कासन कारवाई.
  • एस विभागात एकूण 589 तक्रार, 37 दुबार तक्रार, 552 अनधिकृत बांधकाम, फक्त 8 निष्कासन कारवाई.
  • टी विभागात एकूण 249 तक्रार, 9 दुबार तक्रार, 240 अनधिकृत बांधकाम, फक्त 3 निष्कासन कारवाई.

हेही वाचा-चिंताजनक! राज्यात शुक्रवारी 15 हजार 817 नवे कोरोनाबाधित

ABOUT THE AUTHOR

...view details