मुंबई -भाजपाच्या माजी प्रवक्ता नुपूर शर्मा ( Nupur Sharma ) यांनी मुस्लिम समाजाच्या धर्मगुरू मोहम्मद पैगंबर विरोधात वक्तव्य केले होते. याला समर्थन करणारे पोस्ट करणारे अमरावतीतील उमेश कोल्हे यांच्या हत्या करण्यात ( Umesh Kolhe murder Case ) आली होती. या प्रकरणाचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयाने एनआयएला दिल्यानंतर या प्रकरणातील सर्व आरोपींना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टामध्ये आज हजर करण्यात आले आहे. यावेळी या सर्व आरोपींना 15 जुलै पर्यंत एनआयए कोठडी देण्यात ( Umesh Kolhe murder Case Accused NIA Custody ) आली आहे.
एनआयएकडून कोठडीची मागणी - एनआयएने कोर्टात म्हटले की, या आरोपींची दहशतवादी संघटनेची संबंध असल्याचे अनेक पुरावे तपासादरम्यान सापडले आहे. सध्या आरोपींची कोणत्या दहशतवादी संघटनेची संबंध आहे. या संदर्भात खुलासा करता येणार नाही मात्र या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असू शकतो. याकरीता या सर्व आरोपींना 15 दिवसाची एनआयए कोठडी देण्यात यावी. या आरोपींविरोधात दहशतवादी संघटनेची संबंधित UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - Umesh Kolhe PM Report : उमेश कोल्हेंचा पीएम रिपोर्ट; कॅरोटीन धमनी कापल्याने मृत्यू, राज्यभरात अनेक ठिकाणी सर्च ऑपरेशन
सात जणांना झाली होती अटक - एनआयए कडून आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये इरफान खान (32), मुदस्सर अहमद उर्फ सोनू रजा शेख इब्राहिम (22), शाहरुख पठाण उर्फ बादशाशा हिदायत खान (25), अब्दुल तौफिक उर्फ नानू शेख तस्लीम (24), शोएब खान उर्फ भुर्या साबीर खान (22), अतीब रशीद आदिल रशीद (22), युसूफ खान बहादूर खान (44) यांचा समावेश आहे.
हेही वाचा -उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील सातही आरोपींना मुंबईत हलविले, एनआयए न्यायालयासमोर हजर करणार
काय आहे प्रकरण?नुपूर शर्मा यांचे समर्थन केले म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान शेख हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता, हे समोर आले आहे. त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली. प्रथमदर्शनी ही हत्या लूटपाट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र आज तब्बल 12 दिवसांच्या तापसानंतर अमरावती शहर पोलिसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाली असल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याचे ट्विट केले आणि त्यानंतर अमरावती पोलिसांनी ही माहिती दिली.
हेही वाचा -Umesh Kolhe Murder Case : उमेश कोल्हे हत्याप्रकरण चौकशीसाठी पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्याला अटक