मुंबई - टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल गहना वशिष्ठला मुंबई क्राइम ब्रँचने अटक केली होती. टीव्ही, चित्रपट या क्षेत्रामध्ये पदार्पण करू इच्छिणाऱ्या आणि यामध्ये करीअर करण्यासाठी धडपड करणाऱ्यांना काम देण्याचे आमिष दाखवून त्यांना पॉर्न व्हिडिओ निर्मितीसाठी काम करण्यास ती भाग पाडत होती. त्यानंतर ते व्हिडिओ विविध वेबसाईटवर प्रदर्शित करत लाखो रुपये कमवत असल्याचा तिच्यावर आरोप आहे. यानंतर आता अजून एक मॉडेल समोर आली असून, तिने फिल्म क्षेत्रातील एका दिग्गज प्रोड्युसरचे यात हात असल्याचा आरोप केला आहे. सागरिका शोना सुमन असे त्या मॉडेलचे नाव असून, तिने उमेश कामतरही गंभीर आरोप केले आहेत.
मुंबई पोलिसांच्या प्रोपर्टी सेलकडून मढ येथे करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान पॉर्न फिल्म चित्रीकरण करणार्या 9 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. या नऊ आरोपींना 10 फेब्रुवारीला मुंबईतील न्यायालयामध्ये हजर केले असता यातील 5 जणांना न्यायालयीन कोठडी मिळाली असून, 4 आरोपींना पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी अनेक फिल्म क्षेत्रातील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सागरिका शोना सुमनने केला मोठा खुलासा
एका दिग्ग्ज प्रोड्युसरचा पॉर्न व्हिडिओ प्रकरणात हात असल्याचा गंभीर आरोप मॉडेल सागरिका शोना सुमनने केला आहे. तसेच उमेश कामत याच्यावरही तिने आरोप केले आहेत. लॉकडाऊनच्या काळात मला 20 वेळा व्हिडिओ कॉल करून न्यूड ऑडीशन देण्याची मागणी उमेश कामत याने केली होती. तसेच अनेक ऑफरही त्याने मला दिल्या होत्या. त्यावेळी मी न्यूड ऑडीशनसाठी नकार दिल्याचे सागरिकाने सांगितले आहे.
5 जणांना न्यायालयीन, तर 4 जणांना पोलीस कोठडी
या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या वंदना तिवारी उर्फ गहना वशिष्ठ, उमेश कामत, दिपांकर खासनवीस उर्फ शान बॅनर्जी व तनवीर हाश्मी या आरोपींना 15 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर यास्मिन रसूल बेग खान ऊर्फ रुवा, प्रतिभा विक्रम नलावडे, मोनू गोपालदास जोशी, भानू ठाकूर, मोहंमद आतिफ नसिर अहमद या आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
शान बॅनर्जी आहे कंपनीचा संचालक
दिपांकर खासनवीस उर्फ शान बॅनर्जी हा या प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेल्या एका महिलेचा पती असून, पेशाने तो फोटोग्राफर आहे. याबरोबरच ज्या कंपनीच्या माध्यमातून पॉर्न फिल्म शूट केली जात होती त्या कंपनीचा तो संचालकसुद्धा असल्याचं समोर आले आहे. या अगोदर अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री गहना वशिष्ठ व उमेश कामत या दोघांच्या दरम्यान बँकेच्या माध्यमातून काही आर्थिक व्यवहार झाले असून, उमेश कामत याच्या एका बँक खात्यात व गहना वशिष्ठ हिच्या दोन बँक खात्यामध्ये परदेशातून हजारो डॉलर आले असल्याचा पोलिसांचा दावा आहे. हे पैसे आल्यानंतर त्याचे वाटप केले जात असल्याचेही समोर आले आहे.