महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Thackeray and Shinde faction dispute आता पुन्हा नावावरून ​ठाकरे आणि शिंदे गट येणार आमने-सामने

शिवसेनेच्या चिन्हावर आणि पक्षावर केंद्रीय निवडणूक आयोगाने गदा आणल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटाकडून (Thackeray and Shinde faction dispute) नव्या नावाचा शोध सुरु झाला. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदे गट आमने - सामने येणार (dispute on name of party) आहेत.

Thackeray and Shinde
​ठाकरे आणि शिंदे

By

Published : Oct 9, 2022, 12:30 PM IST

मुंबई : शिवसेनेच्या चिन्हावर आणि पक्षावर केंद्रीय निवडणूक आयोगाने गदा आणल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटाकडून (Thackeray and Shinde faction dispute) नव्या नावाचा शोध सुरु झाला. मात्र, दोन्हींकडून एकच नाव अंतिम करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदे गट आमने - सामने येणार (dispute on name of party) आहेत.

दोन्हींकडून एकच नाव -एकनाथ शिंदे यांच्या केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले आहेत. पक्षात फूट पडल्यानंतर शिंदेंनी पक्षावर दावा ठोकला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या दरबारी गेले. न्यायालयाने घटनापीठ नेमले. अखेर घटनापीठाने निवडणूक आयोगाकडे हा वाद सोपवला. आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हच गोठवले. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची कोंडी झाली आहे. तसेच दोघांनाही दुसरे नाव आणि चिन्हांचे तीन पर्याय सोमवारपर्यंत देण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. त्यानुसार दोन्हीकडून नावाबाबत विचारविनिमय सुरू आहे. दरम्यान, ठाकरे आणि शिंदे दोघांनीही 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे' या नावाची मागणी केल्याचे समोर आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने निर्णय देऊनही पुन्हा नावाचा नवा वाद निर्माण झाला (Thackeray and Shinde) आहे.


शिवसेना बाळासाहेब ठाकरे -ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटाच्या (Eknath Shinde) मागणीनुसार शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे नावही दोन्हीपैकी कोणत्याही गटाला मिळणे मुश्किल आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे बाळासाहेब ठाकरे वडील आहेत. बाळासाहेबांमुळे शिवसेनेची मोठी ओळख आहे. मात्र, ते लोकनेते असल्याने या नावावर निर्बंध येण्याची शक्यता आहे. शिवाय, एकाच वेळी दोघांना ही नावे देता येणार नाहीत. निवडणूक आयोग देखील तशी भूमिका घेणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही गट आमने- सामने येण्याची चिन्हे आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details