मुंबई - निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्य बाण हे चिन्ह तात्पुरते गोठविले ( Election commission freeze party sign ) आहे. या निर्णयानंतर ठाकरे गटातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अशातच उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो पोस्ट ( Uddhav Thackerays first reaction ) करत जिंकून येणारच असे म्हटले आहे. मुंबई - निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतरही अंधेरी पूर्व विधानसभेची पोट निवडणूक जिंकून दाखवणारच, असा आत्मविश्वास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी बंडखोर शिंदे गटाने केली होती.
निवडणूक लढवण्याचा विश्वास सोशल मीडियावरून व्यक्तशिवसेना कोणाची हा वाद मिटवण्यासाठी निवडणूक आयोगाने शनिवारी धनुष्यबाण हे चिन्ह गोठवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. आगामी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची निवडणूक धनुष्यबाण या चिन्हाविना लढवावी लागणार आहे. फुटीर शिंदे गटावर ठाकरेंकडून चौफेर टीकास्त्र सुरू आहे. शिवसेनेत चिन्ह गोठल्याने चलबिचल सुरू आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी धनुष्यबाण चिन्हाविनाच निवडणूक लढवण्याचा विश्वास सोशल मीडियावरून व्यक्त केला.
काय म्हणालेत, उद्धव ठाकरे! सोशल मीडियावर बाळासाहेब ठाकरे यांचा एक फोटो शेअर करत, जिंकून दाखवणारच असा इशारा विरोधकांना दिला आहे. अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणूकीत भाजपने उमेदवार दिला. शिंदे गटाने त्याला पाठिंबा दिल्याने निवडणुकीत चुरस वाढली होती. अशातच निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवल्याने उद्धव ठाकरे यांच्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून ( Uddhav Thackeray on contest election ) राहिले आहे.
आदित्य ठाकरेंनी दिली प्रतिक्रियाखोकेवाल्या गद्दारांनी शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. लढणार आणि जिंकणारच! आम्ही सत्याच्या बाजूने! सत्यमेव जयते, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी ( Aditya Thackeray on Bow and arrow sign ) दिली आहे.
दोन्ही गटांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केंद्रीय निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळी नावे तसेच चिन्हे वाटप करणार असून, निवडणूक आयोगाच्या अंतिम निर्णयापर्यंत हे काम सुरू राहणार आहे. आगामी पोटनिवडणुकीत दोन्ही गट एकाच पक्षाचे नाव, चिन्हावर निवडणूक लढवू शकणार नाहीत.