मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 'ईडी'ने 22 ऑगस्टला चौकशीसाठी बोलावले आहे. याप्रकरणी बोलताना, "मला वाटत नाही, या चौकशीतून काही निष्पन्न होईल, आपण अजून एक-दोन दिवस वाट बघूया" अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी देत, राज ठाकरे यांना पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे, ठाकरे घराणे एकमेकांच्या मदतीसाठी उभे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
'ईडी' प्रकरणी उद्धव ठाकरेंचा राज यांना अप्रत्यक्ष पाठिंबा, म्हणाले... - 'ईडी' प्रकरणी उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
कोहिनूर मिल प्रकरणी 'ईडी'ने राज ठाकरे यांना नोटीस बजावत, २२ ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. राज ठाकरे यांना नोटीस बजावल्यानंतर मनसे आक्रमक झाली होती. सर्व विरोधी पक्षांनी याचा निषेध केला. मात्र, शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. अखेर, उद्धव यांनी आज राज यांच्या ईडी प्रकरणी मौन सोडले.

यासोबतच, छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू आहेत. यावर बोलताना उद्धव यांनी वेळ आल्यावर सर्व काही स्पष्ट होईल अशी प्रतिक्रिया देत, भुजबळ यांच्या प्रवेशावर अधिक बोलणे टाळले. बाहेरून पक्ष प्रवेश केला जातोय, युती बाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, की 'आमचं ठरलंय'. असे सांगतच त्यांनी पुन्हा एकदा स्वबळावर निवडणूक लढवण्यावर भाष्य करणे टाळले.