मुंबई -आगामी विधानसभा निवडणुकीसंबंधी शिवेसना भवनात उद्धव ठाकरेंची सेना नेत्यांसोबत बैठक पार पडली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत, लोकसभेच्या वेळीच, अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात बैठक झालेली आहे. विधानसभेचा फॉर्म्युला तेव्हाच ठरला असून लवकरात लवकर तो जाहीर करू, अशी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
सेना भाजपात जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरत नसल्याची सध्या चर्चा आहे. भाजपच्या महाजनादेश यात्रेचा गुरुवारी नाशिकमध्ये समारोप झाला, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती होती. मात्र यावेळी मोदींनी किंवा देवेंद्र फडणवीस यांनी युतीबद्दल कोणतेही वक्तव्य केले नाही. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी युतीचा फॉर्म्यूला लोकसभा निवडणुकीच्या वेळीच ठरलेला असल्याचे सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे ;
- कुठलीही खळखळ नाही