मुंबई गणेश विसर्जनापासून सुरू झालेला एकनाथ शिंदे आणि शिवसेनेमधला वाद (Dispute between Shinde group and ShivSena) थांबताना दिसत नाही. आमदार सदा सरवणकर यांनी दादर पोलीस स्टेशनच्या आवारातच आपल्यावर गोळी झाडली (sada sarvankar fire case) असल्याचा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात आला. अखेर पोलिसांनी आमदार सदा सरवणकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान, अटकेत असणाऱ्या शिवसैनिकांना जामीन मिळाला. ज्या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल होते. त्या शिवसैनिकांच्या पाठीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray applauds Shiv Sainiks) यांनी कौतुकाची थाप दिली.
'त्या' शिवसैनिकांवर उद्धव ठाकरेंची कौतुकाची थाप - सदा सरवणकर गोळीबार प्रकरण
गणेश विसर्जनापासून सुरू झालेला एकनाथ शिंदे आणि शिवसेनेमधला वाद (Dispute between Shinde group and ShivSena) थांबताना दिसत नाही. आमदार सदा सरवणकर यांनी दादर पोलीस स्टेशनच्या आवारातच आपल्यावर गोळी झाडली (sada sarvankar fire case) असल्याचा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात आला. अखेर पोलिसांनी आमदार सदा सरवणकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान, अटकेत असणाऱ्या शिवसैनिकांना जामीन मिळाला. ज्या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल होते. त्या शिवसैनिकांच्या पाठीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray applauds Shiv Sainiks) यांनी कौतुकाची थाप दिली.
शिवसैनिक हेच शिवसेनेचं ब्रम्हास्त्रशिवसैनिक हेच शिवसेनेचं ब्रम्हास्त्र आहे. हे पुन्हा एकदा प्रभादेवी येथील घडलेल्या प्रकरणावरून अधोरेखित झालं असल्याचं यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले. आमदार सदा सरवणकर बंदुकीचा धाक दाखवत असताना देखील निर्भीडपणे शिवसैनिक सामोरे गेले. उद्धव ठाकरे यांच्या भेटीवेळी आदित्य ठाकरे स्वतः जमिनीवर बसत या शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांच्या बाजूला बसायला दिलं.
आमदार सदा सरवणकर (sada sarvankar firing case) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मातोश्रीवरून पोलिसांवर दबाव (Pressure on police from Matoshree) टाकण्यात आला. तसेच, 200 ते 300 कार्यकर्ते आणि काही नेत्यांना दादर पोलीस स्टेशनला (dadar police station) पाठवण्यात आले. पोलिसांवर दबाव टाकून हा गुन्हा दाखल (case registered under pressure) करण्यात आला आहे. मात्र, या सर्व प्रकरणाची पोलीस योग्यरीत्या चौकशी करतील असं मत एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर (kiran pavaskar) यांनी व्यक्त केलं आहे.
TAGGED:
सदा सरवणकर गोळीबार प्रकरण