मुंबई - शिवसेना आज ( 19 जून ) आपला 56 वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं. माझा पक्ष हा पितृपक्षच आहे, कारण माझ्या पित्याने पक्ष स्थापन केला आहे. शिवसेना स्थापनेचा क्षण मनात आठवून गेला. शिवसेना कणखरपणे उत्तर देत आली आहे आणि देत राहू. 56 वर्षात शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलं, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं ( Uddhav Thackeray On Shivsena Vardhapan Din 2022 ) आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेच्या स्थापनेवेळी जो नारळ फोडला गेला, त्याचे शिंतोडे माझ्यावर उडाले. ही जबाबदारी किती मोठी असू शकते हे मला तेव्हा माहित नव्हतं. आईचं दुध विकणारा शिवसेनेत नको, असा इशारा दगाबाजांना उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
भाडोत्री सैनिक तसे भाडोत्री पंतप्रधान, मुख्यमंत्री आणा-उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray on Agnipath ) अग्नीपथ योजनेवर टीका केली आहे. उगाच स्वप्ने दाखवून त्यांच्या भवितव्याशी खेळणे आहे. भाडोत्री सैनिक आणले जात आहेत, तसे भाडोत्री पंतप्रधान, मुख्यमंत्री आणा, असा टोला मुख्यमंत्र्यांनी ( Uddhav Thackeray slammed Modi gov ) केंद्र सरकारला लगावला. धाडसाला मरण नसते. हा शिवसेनेचा स्थायीभाव आहे. आणीबाणीत शिवसेनेवर बंदीच आली असे वातावरण होते. त्यावेळी विरोधी पक्ष हतबल होता. आता शिवसेना मजबूत झाली आहे. ज्यावेळी हिंदुत्वाचा उच्चार करायाला कोणीच तयार नव्हते, तेव्हा शिवसेनेने हिंदुत्वाचा नारा बुलंद केला.