महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Uddhav Thackeray Meeting With MLA : नाराजी नाट्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोकणातील आमदारांसोबत बैठक - शिवसेना कोकण आमदार नाराजी

कोकणातील शिवसेनेच्या मंत्र्यांविरोधात पक्षांतर्गत मोठी ( Kokan Annoyed Mla ) नाराजी उफाळून आली होती. त्यानंतर अनेकांकडून पालकमंत्री बदलण्याची आग्रही मागणी करण्यात आली. अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray Meeting MLA In Kokan ) यांनी सक्रिय होत, कोकणातील शिवसेना आमदारांची तातडीने बैठक घेतली.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

By

Published : May 9, 2022, 10:04 PM IST

मुंबई -कोकणातील शिवसेनेच्या मंत्र्यांविरोधात पक्षांतर्गत मोठी नाराजी उफाळून आली होती. त्यानंतर अनेकांकडून पालकमंत्री बदलण्याची आग्रही मागणी करण्यात आली. अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray Meeting MLA In Kokan ) यांनी सक्रिय होत, कोकणातील शिवसेना आमदारांची तातडीने बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आमदांना खडे बोल सुनावले. तसेच स्थानिक पातळीवर भेडसावणारे प्रश्न त्वरित सोडवू, अशी ग्वाही शिवसैनिकांना देत वादावर पडदा टाकला. 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बैठक घेतली. बैठकीला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ), रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब ( Anil Parab ), सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत ( Uday Samant ), शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत ( Vinayak Raut ), खासदार अनिल देसाई ( Anil Desai ) आदी उपस्थित होते.

काय आहे प्रकरण? -कोकणातील पालकमंत्री अनिल परब, उदय सामंत लक्ष देत नाहीत, अशी स्थानिक लोकप्रतिनिधीची तक्रार होती. नागरी विकास काम होत नसल्याने लोकांच्या रोषाचा सामना करावा लागतो. सातत्याने ही बाब पालकमंत्र्यांच्या कानावर घालून ही दुर्लक्ष केले जाते. आगामी काळात याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकमंत्री बदलण्यात यावे, असा ठराव स्थानिक शिवसैनिकांनी चिपळूणमध्ये सभा घेऊन मंजूर केला. तसेच तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवला.

बैठकीत नेमकं काय झालं? -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही बाब गांभीर्याने घेत, कोकणातील शिवसैनिकांना आमदार, नेत्यांची तातडीची बैठक बोलावली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, भिवंडी, पालघर येथील स्थानिक परिस्थितीचा लोकप्रतिनिधींकडून आढावा घेतला. मुंबईसह कोकणातील १४ आमदार उपस्थित होते. कोकणातील विकासात्मक कामांसंदर्भात ही बैठक होती. येथील प्रकल्प तसेच स्थानिक प्रश्नांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थानिक आमदारांची मते जाणून घेतली. यावेळी कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांना नेत्यांचे कान उपटले. तसेच कोकणच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध असून येथील रस्ते, पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा तसेच पर्यटनाच्या सुविधा आदी प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली. स्थानिक पातळीवर भेडसावणारे प्रश्न तातडीने सोडविण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.

हेही वाचा -NIA Raids In Mumbai : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संबंधित 29 ठिकाणांवर एनआयएची छापेमारी; तिघेजण ताब्यात

ABOUT THE AUTHOR

...view details