मुंबई : दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार ? याची उत्सुकता सर्वांना लागली असतानाच आता उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray meeting) दौरा जाहीर झाला आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर 'मी काही काळ शिवसेना भवनात बसेल. तिथे पक्ष संघटन मजबूत करेल आणि महाराष्ट्र दौऱ्यावर निघेल' असं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. ठरल्याप्रमाणे आता उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचा पहिला टप्पा जाहीर करण्यात आला आहे. दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे नऊ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे ठाण्यातील टेम्भी नाक्यावर पहिली सभा घेणार (Uddhav Thackeray meeting On 9 Octobe) आहेत.
शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना -ठाण्यातील शिवसेनेची तत्कालीन जिल्हाध्यक्ष आनंद दिघे यांचे कार्यकाळात ठाण्यात शिवसेना वाढीस लागली. याच आनंद दिघे यांचे वट्ट शिष्य म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे ओळखले जातात. आजच्या घडीला एकनाथ शिंदे हे बंडखोर आमदारांच्या गटाचे नेते असून राजन विचारे हे अजूनही उद्धव ठाकरेंसोबत आहेत. शिवसेनेने जिंकलेली पहिली महानगरपालिका निवडणूक, ती म्हणजे ठाणे महानगरपालिकेची. ठाणा महानगरपालिकेपासून शिवसेनेला पालिकांमध्ये सत्ता मिळण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना असं म्हटले (Uddhav Thackeray meeting at Tembi Naka in Thane) जातं.