हैदराबाद - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अलीकडेच अभिनेत्रींचा चित्रपट 'थलायवी' सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिने तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारली होती. आता कंगना रणौतने मुंबईतील बंद सिनेमागृहांवरून महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाली कंगणा -
तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. 'महाराष्ट्र सरकारने अद्याप मुंबईत चित्रपटगृहे उघडलेली नाहीत. त्यामुळे चित्रपट उद्योगाला मोठे नुकसान होत आहे. यासोबतच कंगना रणौतने उद्धव ठाकरे यांना जगातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून टोलाही लगावला आहे. चित्रपटसृष्टीतून चित्रपट संस्कृती पूर्णपणे नष्ट होईपर्यंत महाराष्ट्र सरकार सिनेमागृह बंद ठेवणार आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्याच्या रांगेत अनेक चित्रपट आहेत आणि कलाकार, निर्माते, वितरक आणि थिएटर ऑपरेटर्सबद्दल कोणालाही चिंता नाही. बॉलिवूडने शांतपणे दुःख सहन करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु जगातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांना कोणीही प्रश्न विचारू शकत नाही.