महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Andheri East By Election : उमेदवारी अर्ज मागे घेतल्यावर उद्धव ठाकरे गटाने मानले भाजपचे आभार - after withdrawal of nomination papers

अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांच्या विरोधातील मुरजी पटेल यांची उमेदवारी (after withdrawal of nomination papers) भाजपाने मागे घेतली आहे. त्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आभार (Uddhav Thackeray group thanked BJP) मानले आहेत. उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी तशी प्रतिक्रिया दिली आहे.

Andheri East ByElection
किशोरी पेडणेकर

By

Published : Oct 17, 2022, 5:10 PM IST

मुंबई : अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांच्या विरोधातील मुरजी पटेल यांची उमेदवारी (after withdrawal of nomination papers) भाजपाने मागे घेतली आहे. भाजपाने जो काही सुसंस्कृतपणा आणि संवेदनशीलता दाखवली, त्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आभार (Uddhav Thackeray group thanked BJP) मानले आहेत. उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी तशी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रतिक्रिया देतांना प्रवक्त्या किशोरी पेडणेकर

ठाकरे घराण्याने पायंडा जपला : अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुकीत भाजपने आपले उमेदवार मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यावर किशोरी पेडणेकर बोलत होत्या. यावेळी बोलताना पेडणेकर म्हणाल्या की, अंधेरी पूर्व मतदार संघात रमेश लटके आमदार होते. त्यांचे निधन झाल्यावर त्यांच्या पत्नीला उमेदवारी निश्चित करण्यात आली. त्यानंतर एक ते सव्वा महिना महाराष्ट्रात राजकीय घमासान पाहायला मिळाले. संस्कृती संस्कार आहे, निधनानंतर त्यांना घरातील एकाला उमेदवारी दिली जाते. बाळासाहेब ठाकरे यांनी तो पायंडा घालून दिला, हा पायंडा उद्धव ठाकरे यांनी जपला. इतर पक्षांचा उमेदवार असला तरी उद्धव ठाकरे यांनी त्याला पाठिंबा दिला. यावेळेला मात्र अंधेरीत असे पाहायला मिळाले नाही. याआधीच्या दोन निवडणूक संस्कृती आणि संस्कार न जपता झाल्या.


भाजपचे मानले आभार :अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले होते. मात्र गेले एक महिना राजीनामा लटकवणे, राजीनामा दिल्यावर त्यांच्यावर घाणेरडे आरोप करणे, त्यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवणे, या सर्व गोष्टी घडत असताना एक शिवसैनिक पुढे जात होता. लटके यांना कोर्टात जावे लागले. कोर्टाच्या निर्णयाने पालिकेचे तोंड आपटले. काल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले, लोकनेते शरद पवार यांनीही तेच सांगितले. भाजपाला हा निर्णय घेणे इतके सोपे नव्हते. काळजावर दगड ठेवून त्यांना हा निर्णय घ्यावा लागला असेल. तरीसुद्धा उशिरा का होईना पण जो काही सुसंस्कृतपणा आणि संवेदनशीलता दाखवली त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजपा नेत्यांचे आभार मानते, असे पेडणेकर यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details