महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

‘ठाण्यात मुंबईसारख्या कोविड रुग्णालयांच्या मोठ्या सुविधा तातडीने उभारा’

नागरिकांसह स्वयंसेवी संस्थांना कोरोनाच्या लढाईत सामील केल्यास साथीवर नियंत्रण मिळविणे सोपे जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सांगितले.

संग्रहित - उद्धव ठाकरे
संग्रहित - उद्धव ठाकरे

By

Published : Jul 9, 2020, 3:24 PM IST

मुंबई - कोविड रुग्णांच्या मुद्द्यावरून झालेला वाद आणि ठाण्यातील वाढता कोरोना संसर्ग चिंताजनक आहे. येणाऱ्या काळात रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन प्रत्येक पालिका क्षेत्रात मुंबईतील कोविड रुग्णालयांच्या उभारणे सुरू करा, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिली. ते पालिका आयुक्तांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये बोलत होते.

नागरिकांसह स्वयंसेवी संस्थांना कोरोनाच्या लढाईत सामील केल्यास साथीवर नियंत्रण मिळविणे सोपे जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सर्व आयुक्तांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कठोर पाउले उचलण्यास मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांनी सांगितले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, तीन-चार महिन्यांच्या लढाईत काय करावे आणि काय करू नये याविषयी सर्वाना पुरेशी माहिती झाली आहे. तसेच सर्व सुचना आणि निर्देश स्वयंस्पष्ट असतात. याप्रमाणे सर्व आयुक्तांनी अधिक बारकाईने लक्ष घालून कारवाई करावी. तसे केल्यास आपल्याला अपेक्षीत यश मिळेल, अशी मला खात्री आहे. यापूर्वीच्या पालिकांतील अधिकाऱ्यांच्या बदलीमागे कार्यक्षमता हे कारण नव्हते. कोरोनाची वाढ गुणाकारासारखी होते आहे. त्यामुळे आपल्याला खूप तातडीने पाउले उचलणे गरजेचे आहे. आपण पुढे काही करण्यापूर्वी दररोज रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसते.

मुंबईसारख्या मोठ्या सुविधा उभारा

मार्चपासून जुलैपर्यंतच्या कालावधीत आपण जम्बो सुविधा उभारण्यावर भर दिला. मुंबईमध्ये सुसज्ज सुविधा निर्माण झाल्या आहेत. तशा सुविधा महानगर क्षेत्रातही होणे अपेक्षित होते. वारंवार तशा सुचना देण्यात आल्या होत्या. पण पाहिजे तेवढ्या सुविधा उभारलेल्या दिसत नाहीत. सुविधांसाठी मोठे उद्योग, कंपन्या व संस्था यांचीदेखील मदत घ्या. मुंबईतील सुविधा म्हणजे जागा दिसली आणि उभारले तंबू अशा नाहीत. प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित ड्रेनेज, शौचालय व पिण्याचे पाणी या सोयी आहेत. अतिदक्षता विभाग व डायलेसिस सुविधा आहेत. पालिकांनी आवश्यक त्या औषधांचा पुरेसा साठा करून ठेवणे गरजेचे आहे, असेही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

शहरांत कोरोना द्क्षत्या समित्या नेमा

नागरिकांच्या व जनतेच्या सहभागामुळे स्वातंत्र्यांच्या काळात देशभर वातावरण निर्माण झाले होते. नुकतेच लोकांनी स्वत: हून चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून मोठा संदेश दिला. त्याप्रमाणेच कोरोनाची ही लढाई फक्त सरकारची नाही. वाड्या आणि वस्त्या, कॉलनीमध्ये नागरिकांच्या कोरोना दक्षता समित्या स्थापन करा. स्वयंसेवी संस्था , युवकांना यात सहभागी करून घ्या. ज्येष्ठ नागरिकांना दुसरे काही आजार आहेत का? तसेच त्यांची ऑक्सिजन पातळी बरोबर आहे का? लोक मास्क घालतात का? यासाठी नागरिकांच्या समित्याची मदत होईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुंबईत २०१० मध्ये मलेरिया व डेंग्यूच्यावेळी मुंबईच्या वस्त्यावस्त्यांत लोकांच्या मदतीने फवारणी केली होती. त्याप्रमाणे मिशन मोडवर हे काम सर्वांनी करावे. लोकांमध्ये जिद्द निर्माण करा, म्हणजे ही लढाई लढणे सोपे जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी अजोय मेहता म्हणाले, की कोरोनाची साथ झपाट्याने पसरत आहे. हा केवळ राज्यासाठी नव्हे तर देशासाठीसुद्धा चिंतेचा विषय झाला आहे. रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, संस्थात्मक विलगीकरण वाढविणे आदी सूचना मेहता यांनी पालिका आयुक्तांना दिल्या आहेत. यावेळी विविध पालिका आयुक्तांनी त्यांच्या क्षेत्रात करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. विभागीय आयुक्त लोकेश चंद्र यांनीदेखील कोरोनाबाबतच्या उपाययोजनांच्या सूचना दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details