महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सरकार पाडण्यावरून उद्धव ठाकरेंची मोदी सरकारवर जोरदार टीका - topple the state government

मार्मिकच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त Narmik 62nd Anniversary शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena chief Uddhav Thackeray यांनी आज पुन्हा केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल ( Uddhav Thackeray criticizes BJP ) केला आहे. लष्करांच्या Army आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारकडे पैसे आहे हे कोणते स्वातंत्र्य? उद्धव ठाकरे यांचे राज्यातील सत्ता करुणानंतर पुन्हा एकदा भाजप हल्लाबोल केला आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Aug 13, 2022, 9:08 PM IST

मुंबईदेशाच्या गादीवर बसले म्हणून हम करे सो कायदा चालला आहे हे लोकशाही नाही असे मार्मिकच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त Narmik 62nd Anniversary शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena chief Uddhav Thackeray यांनी आज पुन्हा केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल ( Uddhav Thackeray criticizes BJP ) केला आहे. लष्करांच्या Army आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारकडे पैसे आहे हे कोणते स्वातंत्र्य? उद्धव ठाकरे यांचे राज्यातील सत्ता करुणानंतर पुन्हा एकदा भाजप हल्लाबोल केला आहे.

लोकशाही मृतावस्थेतउद्धव ठाकरे पुढे म्हणाले की ही आझादी आणि त्याचा अमृत महोत्सव नाही. अमृत महोत्सव अमृतासारखाच हवा. अमृत महोत्सवी वर्षात लोकशाही मृतावस्थेत न्यायची असेल तर अमृत महोत्सव कसला आला. असा सवाल करत लोकशाही मृतावस्थेत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत म्हणजे भाजपाला देशातील संघराज्य पद्धती संपवायची आहे का असा तिखट सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना केला आहे. नड्डा यांचे हे मत देशांच्या नागरिकांचे मत आहे का त्यावर निवडणुका व्हायला हव्यात असे सांगत त्यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. देशात पुढचे काही वर्षात केवळ भाजपाच असेल सर्व राजकीय पक्ष संपतील, प्रादेशिक पक्षही उरणार नाहीत असे वक्तव्य जे पी नड्डा यांनी केले होते. त्यावर शिवसेना पक्षप्रमुखांनी पलटवार केला आहे.



प्रादेशिक पक्ष संपवण्याचे राजकारण देशातील मांडणी झाली. संघराज्य आहे. त्यात सर्व राज्य आहे.ही घटक राज्य एकत्र येऊन देशाचं स्वातंत्र्य अस्तित्वात आलं आहे. हे सर्व राज्य एकत्रं आल्याने त्याला संघराज्य म्हणतात. मग नड्डांना काय म्हणायचं आहे. प्रादेशिक पक्ष संपवायचे म्हणजे त्यांना संघराज्य संपवायचं आहे का. हे संघराज्य नको हे तुमचं मत देशाच्या नागरिकांचं मत आहे का. त्यावर निवडणुका व्हायला हव्यात. आज तुम्ही गादीवर बसलात म्हणून हम करे सो कायदा चाललं आहे. ही लोकशाही नाही. ही आझादी आणि त्याचा अमृत महोत्सव नाही. अमृत महोत्सव अमृता Azadi ka amrit mohatsav सारखाच हवा. अमृत महोत्सवी वर्षात लोकशाही मृतावस्थेत न्यायची असेल तर अमृत महोत्सव कसला आला.



लोकशाही म्हटल्यावर निवडणुका आल्या, राजकीय पक्ष आले. आलेच पाहिजे. प्रत्येकाचं मत समान नसेलच. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याची मुभा मांडण्याची परवानगी असलीच पाहिजे. त्यालाच लोकशाही म्हणतात. भाजपचे अध्यक्ष नड्डा BJP President Nadda यांनी एक वक्तव्य केलं आहे. ते लोकशाहीला घातक आहे की नाही. त्याचा विचार करण्याची गरज आहे. मी पक्षाचा प्रमुख आहे. कालपर्यंत मुख्यमंत्री आहे. उद्या पुन्हा शिवसेनेची सत्ता येणारच आहे. हे येणं जाणं सुरूच असतं. पण नड्डा जे बोलले या देशात एकच पक्ष राहणार आहे. बाकीचे पक्ष संपत चालले आहेत. विशेषता शिवसेना संपत चालली आहे. बघू. त्यांनी प्रदेशाध्यक्ष केलं. त्यांच्या नावात किती कुळे आहेत माहीत नाही. पण त्यांची किती जरी कुळं उतरली तरी ते शिवसेना नष्ट करू शकत नाही. मग ते ५२ असतील किंवा १५२ असतील. मला काही फरक नाही पडत. लोकशाहीला घातक प्रादेशिक पक्ष संपवून टाकायचं. अमेरिका, चीन आणि रशिया सारख्या बलाढ्य देशांनी लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी लष्कर कपात केल्याचं मी कधी ऐकलं नाही. पण आपल्या देशात ते सुरू आहे. लष्कर चालवण्यासाठी, लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी ( modernize army ) तुमच्याकडे पैसा नाही. पण राज्या राज्यातील सरकारे पाडण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत. हे कोणतं स्वातंत्र्य आहे? असा संतप्त सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

मार्मिकचे प्रकाशन

लष्कर चालवण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत डीपीवर तिरंगा टाकायचाच. आपल्याकडे सोशल मीडिया जोरात आहे. सोशल मीडिया Social media जोरात आहे. पण जे चाललंय ते सोसल का. स्वातंत्र्यासाठी जीवाची बाजू करण्यासाठी सीमेवर जे उभे आहेत. तिथे लष्करात कपात करणार आहात. शस्त्र घेण्यासाठी माणसं कमी करणार असाल तर शस्त्र कुणाच्या हातात देणार. चीन रशिया अमेरिकेने तरी आधुनिकीकरणासाठी लष्कर कपात केल्याचं माझ्या वाचनात नाही. लष्कर चालवण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत. पण राज्या राज्यातील सरकारे पाडण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत हे कोणतं स्वातंत्र्य आहे. ज्यांच्यामुळे तिरंग्याचं रक्षण होतं. ज्यांच्यामुळे घरावर डीपीवर तिरंगा लावू शकतो त्या लष्कराची कपात करत असाल तर त्याला काय अर्थ आहे. घरात बसून बेंबीच्या देठापासून भारत माता की जय म्हटल्याने शत्रू पळणार नाही. उद्या माझ्या घरावर तिरंगा लावलेला बघून चीन काय पळून जाणार आहे का. घराघरावर तिरंगा का लावला पाहिजे तर देशाचं रक्षण करणाऱ्यांना मी एकटाच नाही. माझ्यासोबत देशही आहे हे दिसलं पाहिजे.






हेही वाचाIndian Independence Day सैक्सोफोनवरील देशभक्ती गीत एकूण व्हाल मंत्रमुग्ध

ABOUT THE AUTHOR

...view details