मुंबई -शिवसेना हिंदुत्वासाठी जगते. मात्र, भाजपा राजकारणाकरिता हिंदुत्व वापरते. हा फरक शिवसेना आणि भाजपमध्ये आहे, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर केला आहे. मुंबईतील शिवडी येथील शिवसेना शाखेचं उद्घाटन उद्धव ठाकरेंनी केलं. यावेळी अरविंद सावंत, सुभाष देसाई, सचिन अहिर, किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित ( uddhav thackeray attacked shivsena rebel mla ) होते.
'तुम्हाला माझ्या आई-वडिलांच्या...' - शिंदे गटातील बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरेंनी आव्हान दिलं आहे. 'त्यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या फोटेने मतं मागावती. हिंम्मत असेल तर माझ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा फोटो न लावता तुम्ही मत मागा. तुम्हाला माझ्या आई-वडिलांच्या फोटो लावण्याचा अधिकार तुम्हाला नाही,' अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
'तुम्ही तयार राहा' - गेलेल्या बंडखोरांना काय म्हणाले अशी विचारणा करताच उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, 'ही मंडळी दरोडेखोर आहेत. ते शिवसेना संपवायला निघालेत. त्यांचं शिवसेना संपवायचं मोठं कारस्थानं आहे. त्याला उत्तर द्यावे लागणार. गट प्रमुखांचे प्रतिज्ञापत्र, कायदेशीर संघर्षासाठी लागणार आहे. तुम्ही तयार राहा. तुमच्या दोन्ही हातांमध्ये सदस्यांचे अर्जाचे गठ्ठे असायला हवे. फुलांचे गुच्छ नकोत. मला सदस्यांचे अर्जाचे पदाधिकारी यांचे शपथपत्र हवे,' असे आवाहन उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केलं आहे.