महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Dussehra gathering शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आमचाच होणार, उद्धव ठाकरेंची घोषणा

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आता शिवसेनेचे काय होणार हा मोठ्या प्रश्न आहे. शिवसेना आमचीच आहे असा दावा शिदे आणि ठाकरे गडाकडून केला जात आहे. Thackeray announced that the Dussehra gathering त्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे पारंपरिक कार्यक्रामांचीही चांगलीच चर्चा सुरू आहे. त्या स्वरूपाचा दरवर्षी होणाऱ्या दसरा मेऴाव्याचीही चांगलीच चर्चा सुरू आहे. शिवाजी पार्कवर कोणाचा मेळावा होणार या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले आमचाच दसरा मेळावा होणार. त्यामुळे आता दोन्ही गटांत वाद होण्याचे चित्र आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Aug 29, 2022, 3:17 PM IST

Updated : Aug 29, 2022, 3:32 PM IST

मुंबई - शिवाजी पार्कच्या मैदानावर दसरा मेळावा शिवसेनेचा म्हणजे आमचाच होणार अशी गर्जना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आज सोमवार दि. 29 ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. Whose Dussehra gathering at Shivaji Park दरम्यान, ठाकरेंना याबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी दसरा होण्याबाबत ही घोषणा केली आहे. दसरा मेळावा कोण घेणार, याची चर्चा चांगलीच रंगली आहे. अशात उद्धव ठाकरेंनी ही घोषणा केली आहे.

काय म्हणाले आहेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राची माती गद्दारांना जन्म देत नाही, मर्दांना जन्म देते. अनेक विषय आहेत त्या विषयांवर मी दसरा मेळाव्यात मी बोलणारच आहे. दसरा मेळावा हा शिवसेनेचाच होणार आणि तो शिवसेनेचा म्हणजे आमचाच होणार. Dussehra gathering दसरा मेळावा कुणाचा होणार याबाबत संभ्रम असण्याचं काही कारणच नाही. संभ्रम निर्माण करायचा आहे त्यांना तो करू द्या. मला त्याने काही फरक पडत नाही. शिवतीर्थावर शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार. त्यासाठी महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनी तयारीही सुरू केली आहे. असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

दसरा मेळावाही एकनाथ शिंदे हायजॅक करणार महापालिकेच्या संमतीचा विषय आहे असे म्हटल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, की जे काही तांत्रिक मांत्रिक बाबी असतील त्या पाहून घेऊ. मात्र शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवसेनेचाच होणार आहे आणि त्यासाठी तयारीही सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे हे शिवतीर्थावर दसरा मेळावा घेणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण दसरा मेळाव्यासाठी संमती मागणारे दोन अर्ज आल्याचे समजते आहे. शिवसेनेत बंड झाल्यापासून शिवसेना दुभंगली आहे. त्यानंतर आता दसरा मेळावाही एकनाथ शिंदे हायजॅक करणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. अशात उद्धव ठाकरेंनी मात्र या सगळ्याला नकार दिला आणि शिवसेनेचा म्हणजे आमचाच दसरा मेळावा होणार असे ठामपणे सांगितले आहे.

दीपक केसरकर यांनी याबाबत काय म्हणाले आहेतदीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर माहिती दिली. ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या दृष्टीने काही गोष्टी पुढे आणले आहेत. दसरा हा हिंदूंचा महत्वाचा सण मानला जातो. यादिवशी सीमोल्लंघन केलं जातं. चांगल्या कामाची सुरुवात त्याविषयी केली जाते. दसरा मेळावा आणि बाळासाहेब ठाकरे हा अविभाज्य घटक आहे. ते वेगळं करता येत नाही. त्यांच्या हिंदुत्वाच्या विचारापासून आम्ही लांब गेलो नाही. त्याच्यामुळे दसरा मेळावा घ्यावा की घेऊ नये, याबाबत कुठलीही चर्चा एकनाथ शिंदे केली नाहीये, अशी महत्वाची माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे.

बाळासाहेबांच्या विचाराचे तंतोतंत पालन करणे हे आमचे कर्तव्य दसरा मेळावा ही बाळासाहेबांनी सुरु केलीली परंपरा आहे. ती परंपरा पुढे देखील कायम राहायला पाहिजे, अशी एकनाथ शिंदेंची भूमिका आहे. याच्यातून कुठलाही वाद निर्माण होता कामा नये. बाळासाहेबांच्या विचाराचे तंतोतंत पालन करणे हे आमचे कर्तव्य आहे, असं केसरकर म्हणालेत.

हेही वाचा -Gokul Meeting Rada कोल्हापुरात गोकुळच्या सभेआधी राडा, विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी

Last Updated : Aug 29, 2022, 3:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details