मुंबई - मालाड येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांसोबत 20 मिनिटे चर्चा केली. यामध्ये झालेली खलबते अद्यापही गुलदस्लत्यात असली तरीही सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी राजीनामा दिल्याबाबत त्यांचे पक्षप्रमुखांनी कौतुक केले आहे. तसेच आमदारांना संयम बाळगण्याचे आवाहन करून चिंता करण्याचे कारण नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
'संयम बाळगा; चिंता करू नका', उद्धव ठाकरेंचे आमदारांना आवाहन
मालाड येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांसोबत 20 मिनिटे चर्चा केली. यामध्ये आमदारांना संयम बाळगण्याचे आवाहन करून चिंता करण्याचे कारण नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
'संयम बाळगा; चिंता करू नका' - उद्धव ठाकरेंचे आमदारांना आवाहन
3 ते 4 दिवसांत मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी मालाड येथे पार पडलेल्या आमदारांच्या बैठकीत दिली.
आमच्यासाठी सगळे पर्याय खुले असल्याचे ठाकरे यांच्याकडून आमदारांना सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाली असली, तरीही आपण आपला क्लेम करू शकतो असेही ते यावेळी म्हणाले.