महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

उदयनराजे भोसले यांनी घेतली शरद पवारांची भेट; राष्ट्रवादीत प्रवेश करणार? - उदयनराजे भोसले यांनी घेतली शरद पवारांची भेट

उदयनराजे भोसले राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. भाजपाचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी (Udayanraje Bhosale Meet Sharad Pawar) बुधवारी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनं राजकीय चर्चांना जास्त उधाण आलं आहे.

Udayanraje Bhosale meets Sharad Pawar
उदयनराजे भोसले यांनी घेतली शरद पवारांची भेट

By

Published : Dec 15, 2021, 11:47 AM IST

मुंबई -भाजपाचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसलेयांनी बुधवारी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची (Udayanraje Bhosale Meet Sharad Pawar) भेट घेतली. उदयनराजे यांनीच या भेटीचा फोटो ट्विट केला आहे. तसेच ही सदिच्छा भेट असल्याचेही त्यांनी म्हटलं असले तरी या भेटीमागे बरेच काही दडले असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट -

संसदेच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त शरद पवार यांच्यासह उदयनराजे व अन्य खासदार दिल्लीत मुक्कामी आहेत. पवारांचा नुकताच वाढदिवस झाला आहे. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उदयनराजे बुधवारी सकाळी गुलाबाच्या फुलांचा गुच्छ घेऊन शरद पवार यांच्या घरी दाखल झाले. यावेळी दोघांमध्ये काहीकाळ चर्चाही झाली. या भेटीतून आगामी काळात सातारा जिल्ह्यात वेगळी राजकीय समीकरणे तर उदयास येणार नाहीत ना? याचीच चर्चा रंगली आहे. पण मागील काही महिन्यांतील राजकीय घडामोडींनंतर झालेल्या या भेटीनं राजकीय चर्चांना जास्त उधाण आलं आहे.

राष्ट्रवादीच्या वाटेवर उदयनराजे?

उदयनराजे हे लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला रामराम करत भाजपामध्ये दाखल झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत उदयनराजे यांना पराभव पत्करावा लागला. राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील सातारा लोकसभेचे खासदार झाले. याच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पवारांची भरपावसातील प्रचारसभा चांगलीच गाजली. यावेळी त्यांनी उदयनराजेंवर टीका करताना मागील लोकसभेवेळी आपली चूक झाल्याचे सांगत मतदारांना चूक सुधारण्याचे आवाहनही केलं होतं. परंतु आता शरद पवार व उदयनराजे यांच्यातील जवळीक वाढत असल्याचं दिसून आलेलं आहे. उदयनराजे पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर तर नाहीत ना? अशी शक्यताही वर्तवली जात आहे. उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडली असली तरी शरद पवार यांच्यावर असलेले प्रेम व जवळीक संपलेली नाही. मध्यंतरी शरद पवार आजारी असताना त्यांनी पुण्यात त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. आता या सदिच्छा भेटीगाठीतून पुन्हा नवीन सुरुवात करण्यास आरंभ झालेला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details