मुंबई - महाड दुर्घटनेत आपल्या जीवाची पर्वा न करता नावेद यांनी ३५ जणांचे प्राण वाचविले आहेत. यामध्ये त्याला आपले दोन्ही पाय गमाविण्याची वेळ आली आहे. त्यांच्यावर सध्या नेरूळ येथील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची तब्बेत आता चांगली आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
महाड दुर्घटनेत ३५ जणांचे प्राण वाचविणाऱ्या नावेदची मंत्री उदय सामंतांनी घेतली भेट - नावेद महाड दुर्घटना
महाड दर्घटनेत आपल्या जिवाची पर्वा न करता नावेदने अनेक जणांचे प्राण वाचवले होते. याद नावेदला गंभीर दुखापत झाली. आज नावेदची भेट घेऊन मंत्री उदय सामंतांनी त्याला सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
मंत्री सामंत यांनी नावेदची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. सामंत म्हणाले, नावेदला आवश्यक ते सर्व मदत केली जाईल. त्याच्या तब्बेतीमध्ये सुधारणा होत असून तो लवकर बरा होईल. नावेद यांनी महाड दुर्घटनेत अत्यंत महत्वपूर्ण आणि शौर्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याच्या शौर्याची दखल घेऊन त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. असे अश्वासनही त्यांनी दिले आहे. तसेच त्याच्या तब्बेतीबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली असून नावेद यांची प्रकृती व्यवस्थित आहे, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. शिवसेनेकडून सामंत यांनी नावेद यांच्या कुटुंबीयांना यावेळी २ लाख रूपयांची मदत केली.
हेही वाचा -मंदिर उघडण्याच्या मागणीवरून औरंगाबादेत शिवसेना-एमआयएम आमने सामने