मुंबईवेदांत आणि फॉक्स कॉन कंपनीचा प्रस्तावित प्रकल्प गुजरातला गेल्याच्या पार्श्वभूमीवर ( Uday Samant on Vedant foxconns ) गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात रणकंदन सुरू आहे. मात्र असे असले तरी वेदांता प्रकल्प हा दोन टप्प्यात होणारा प्रकल्प आहे त्यातील काही भाग हा महाराष्ट्रात होणारच आहे, असा दावा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ईटीव्ही ( Uday Samant Etv Bharat interview ) भारतशी बोलताना केला.
राज्यातील वेदांता फॉक्सकॉन कंपनीच्यावतीने प्रस्तावित एक लाख 54 हजार कोटी रुपयांचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प गुजरातला पळवल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. शिंदे आणि फडणवीस सरकारने ( Shinde gov on Vedanta project ) हा प्रकल्प गुजरातला बहाल केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर वेदांता कंपनीला योग्य प्रतिसाद न दिल्याने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या उदासीनतेला कंटाळून हा प्रकल्प गुजरातला गेल्याचा प्रति दावा शिंदे फडणवीस सरकारने केला होता. मात्र या प्रकल्पाच्या संदर्भात प्रचंड गदारोळ झाल्यानंतर अखेर वेदांताचा प्रकल्प राज्याबाहेर गेलाच नाही. त्यातील काही भाग अजूनही राज्यात होणार असल्याचे वेदांताचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी ट्विटद्वारे जाहीर केल्याचा दावा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केला आहे.
वेदांता दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातवेदांताचा सेमीकंडक्टर चा प्रोजेक्ट जरी सध्या महाराष्ट्रात प्रस्तावित नसला तरी या प्रकल्पाचा दुसरा टप्पा मात्र महाराष्ट्रातच होणार आहे. या प्रकल्पाची निगडित अन्य उत्पादने ही महाराष्ट्रातच घेण्यात येतील असा दावा करत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला आहे.