महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Uday Samant Special Interview : विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाची नवी दालने खुली करणार - उदय सामंत - उदय सामंत केंद्रीय मंत्री नारायण राणे टीका

उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत म्हणाले, की विद्यार्थ्यांसाठी सीएसआर निधीच्या माध्यमातून ( Uday Samant on new syllabus with CSR help ) अनेक कंपन्यांच्या माध्यमातून नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. तसेचविदेशी विद्यापीठांशी अभ्यासक्रमाबाबत सामंजस्य करार ( MH universities Mou with foreign universities ) करण्यात येत आहेत. विरोधकांनी कितीही आरोप केले तरी विद्यार्थी आणि त्यांचे भवितव्य याबाबत सरकार कसलीही तडजोड करणार नाही.

उदय सामंत  यांची विशेष मुलाखत
उदय सामंत यांची विशेष मुलाखत

By

Published : Dec 2, 2021, 6:25 PM IST

Updated : Dec 2, 2021, 7:39 PM IST

मुंबई -कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये राज्यातील सर्वच क्षेत्रांमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र, तरीही राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने अनेक सकारात्मक पावले उचलल्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत ( MH Higher and Technical Education Minister interview ) यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री सामंत हे ईटीव्ही भारतशी बोलत होते.

उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत म्हणाले, की विद्यार्थ्यांसाठी सीएसआर निधीच्या माध्यमातून ( Uday Samant on new syllabus with CSR help ) अनेक कंपन्यांच्या माध्यमातून नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. तसेच विदेशी विद्यापीठांशी अभ्यासक्रमाबाबत सामंजस्य करारही करण्यात येत आहेत. विरोधकांनी कितीही आरोप केले तरी विद्यार्थी आणि त्यांचे भवितव्य याबाबत सरकार कसलीही तडजोड करणार नाही.

उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची विशेष मुलाखत

हेही वाचा-Shocking Crime in Thane : टायरमध्ये हवा भरणारा पाईप तरुणाच्या गुदव्दारात घुसविल्याने तरुणाचा मृत्यू

कोकणातून नारायण राणे आणि कुटुंबाची ताकद संपली-

महाविकास आघाडी आणि शिवसेनेला नेहमीच लक्ष्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Shivsena leader Uday Samant Slammed Narayan Rane ) यांचा उदय सामंत यांनी समाचार घेतला आहे. मंत्री सामंत म्हणाले, की कोकणातील मतदार आणि शिवसैनिक हा जागरूक आणि निष्ठावंत आहे. त्यामुळे कोकणामध्ये कितीही पेल्यातील वादळे निर्माण झाली तरी त्याला मतदार भुलणार नाही. कोकणातून नारायण राणे आणि कुटुंबाची ताकद आता संपलेली आहे. हे नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि बँकेच्या निवडणुकावरून स्पष्ट होते. त्यामुळे यापुढे राणे यांचे राजकारण संपले आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा-Param Bir Singh Suspended : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांचा अखेर निलंबन

प्राध्यापक, विद्यार्थ्यांना लसीकरण सक्तीचे

लसीकरण करण्याबाबत आता विद्यापीठ तसेच महाविद्यालयांत काम करणार्‍या प्राध्यापक, प्राचार्य आणि विद्यार्थ्यांनादेखील सक्ती करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी नुकतेच औरंगाबादेत पत्रकार परिषदेत ( Vaccination compulsory for professors in colleges ) दिली होती. लसीचे दोन डोस न घेणाऱ्या प्राध्यापकांना मिळणारे लाभ देखील थांबवण्यात येऊ शकतात. त्यामुळे सर्वांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन सामंत यांनी केले होते.

हेही वाचा-Omicron In India : भारतात ओमायक्रॉनचा शिरकाव, कर्नाटकमध्ये सापडले दोन रुग्ण

Last Updated : Dec 2, 2021, 7:39 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details