मुंबई - 'सर्व विद्यापाठांचे कुलगुरू जे निर्णय घेतायेत ते त्यांना घेऊ द्यावेत, त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले आहे. राज्यपालांच्या मते, परीक्षा साध्या सोप्या पद्धतीने कशा घेता येतील त्याबाबत विचार केला पाहिजे. त्यामुळे याबाबत ते स्वतः उद्या कुलगुरुंची बैठक घेणार असून त्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जाईल.' अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षांचा निर्णय उद्या; राज्यपालांच्या भेटीनंतर उदय सामंतांची माहिती - अंतिम वर्षांच्या परिक्षा
३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षेसंदर्भात निकालासह सर्व प्रक्रिया पूर्ण करावी आणि ज्या विद्यापीठांना स्थानिक पातळीवरील कोविड-१९ चा प्रादुर्भाव किंवा तांत्रिक अडचणी आल्या तर त्यांनी आपली निकालाची प्रक्रिया जास्तीत जास्त १० नोव्हेंबर २०२० पर्यंत पूर्ण करावी अशा सूचना सामंत यांनी यापूर्वीच दिल्या आहेत.
हेही वाचा - दुसऱ्या महायुद्धाची पंच्याहत्तरी: ज्यू नागरिकांचे शिरकाण; मानवतेला काळीमा फासणारी घटना
३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षेसंदर्भात निकालासह सर्व प्रक्रिया पूर्ण करावी आणि ज्या विद्यापीठांना स्थानिक पातळीवरील कोविड-१९ चा प्रादुर्भाव किंवा तांत्रिक अडचणी आल्या तर त्यांनी आपली निकालाची प्रक्रिया जास्तीत जास्त १० नोव्हेंबर २०२० पर्यंत पूर्ण करावी अशा सूचना सामंत यांनी यापूर्वीच दिल्या आहेत.
एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करता विधी व न्याय विभाग आणि अॅडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल असेही सामंत यांनी स्पष्ट केले आहे. बैठकीत परीक्षा किती तारखेपर्यंत घेऊ शकतो, परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन, परीक्षेची तारीख किती असावी, निकालाची तारीख किती असावी, परीक्षा पद्धत कशी असेल, अशा विविध विषयांवर कुलगुरू आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांची चर्चा झाली आहे. उद्या पुन्हा राज्यपाल कुलगुरुंशी चर्चा करून परीक्षांसंदर्भात अंतिम निर्णय घेतील, असे मंत्री सामंत यांनी शेवटी स्पष्ट केले.
हेही वाचा -मुंबईत चाचण्या वाढवा, देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र