मुंबई -भांडुपच्या व्हिलेज रोड परिसरामध्ये दोन महिला फुटपाथवरील गटाराचे झाकण तुटल्याने पडल्याची प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी पडलेल्या पावसामध्ये भांडुप विलेज रोड परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या पाण्यातून दोन महिला रस्ता शोधत होत्या. त्यावेळी अचानक या महिला एकामागोमाग एक गटारात पडल्या. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी पावसाचा जोर ओसरला होता. त्यामुळे नाल्यांमध्ये पाण्याचा प्रवाह कमी होता. नाही तर या दोन्ही महिलांच्या जीवावर बेतले असते. भांडुपमध्येच दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे एक महिला मेन हॉलमध्ये पडून मृत्यूमुखी पडली होती. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
Manhole Horror उघड्या गटारात पडल्या २ महिला, बघा हृदयाचा थरकाप उडवणारं सीसीटीव्ही फुटेज - मुंबईच्या पावसा बद्दल बातमी
उघड्या गटारात दोन महिला पडल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ही घटना भांडुपच्या व्हिलेज रोड परिसरामध्ये घडली.
24 तासांत 231.3 मिमी पाऊस -
मुंबईत काल झालेल्या पहिल्याच पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपले. पहिल्याच पावसात मुंबईच्या अनेक भागात पाणी साचले होते. यामध्ये रस्ते वाहतूक पूर्णपणे कोलमडली होती. रेल्वे सेवा संपूर्ण ठप्प झाली होती. आजही संततधार सुरुच असून काही भागात मात्र पावसाने थोडीशी विश्रांती घेतली आहे. असे असले तरीही आज मुंबईत ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढचे 3-4 मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वतीने करण्यात आले आहे. मुंबईत मागील 24 तासांत 231.3 मिमी पाऊस झाला असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.