मुंबई - दादर येथे फलाट क्रमांक २ आणि ३ च्या मध्य बाजूला सरकत्या जिन्यावरून अचानक तोल जाऊन २ वयोवृद्ध महिला खाली पडल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. ही घटना शुक्रवारी घडली असून यात कोणीही जखमी झालेले नाही.
दादर रेल्वे स्थानकात सरकत्या जिन्यावरुन तोल जाऊन २ महिला पडल्या; घटना सीसीटीव्हीत कैद - पूल
दादर रेल्वे स्थानकात सरकत्या जिन्यावरुन अचानक तोल जाऊन २ वयोवृद्ध महिला खाली पडल्या. मात्र, त्यांना सुखरुप पुलावर घेऊन जाण्याचे काम तिथे गस्त घालत असलेले जीआरपीच्या पोलिसांनी केले.
वयोवृद्ध महिलांना सरकत्या जिन्यावरुन सुखरुप पुलावर घेऊन जाताना जीआरपीचे पोलीस
वृद्ध महिला सरकत्या जिन्यावरून पडल्यावर तात्काळ तिथे गस्त घालत असलेले जीआरपीच्या पोलीस नाईक एम. एन. जाधव आणि पोलीस शिपाई बी.एस. आव्हाड या जवानांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्या महिलांची मदत केली. तसेच त्यांना सुखरूप पुलावर घेऊन गेले.