महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दोन आठवड्यांपूर्वी एनसीबी'ला 'या' पार्टीबद्दल माहिती मिळाली होती -एस.एन प्रधान - Aryan Khan

दोन आठवड्यांपूर्वी एनसीबी'ला क्रूझवरील ड्रग्ज पार्टीबद्दल माहिती मिळाली होती. दरम्यान, रात्री सापळा रचून या पार्टीवर एनसीबीने कारवाई केली आहे. तसेच, एनसीबीचे संचालक एस.एन प्रधान यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. क्रूझवरील ड्रग्ज पार्टीबद्दल २ आठवड्यापूर्वी माहिती मिळाली होती. यामध्ये बॉलीवूड लिंक समोर आली आहे. मात्र, कोणीही आणि कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती यामध्ये गुंतलेला असो कारवाई केली जाईल. तसेच, याबाबत आणखी काही माहिती घेऊन त्याचा पुर्ण शोध घेण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहितीही प्रधान यांनी दिली आहे.

Narcotics Control Bureau
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ऑफीस

By

Published : Oct 3, 2021, 2:22 PM IST

मुंबई -दोन आठवड्यांपूर्वी एनसीबी'ला क्रूझवरील ड्रग्ज पार्टीबद्दल माहिती मिळाली होती. दरम्यान, रात्री सापळा रचून या पार्टीवर एनसीबीने कारवाई केली आहे. तसेच, एनसीबीचे संचालक एस.एन प्रधान यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. क्रूझवरील ड्रग्ज पार्टीबद्दल २ आठवड्यापूर्वी माहिती मिळाली होती. यामध्ये बॉलीवूड लिंक समोर आली आहे. मात्र, कोणीही आणि कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती यामध्ये गुंतलेला असो कारवाई केली जाईल. तसेच, याबाबत आणखी काही माहिती घेऊन त्याचा पुर्ण शोध घेण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहितीही प्रधान यांनी दिली आहे. तसेच, आमचे ध्येय नशामुक्त भारत करणे हे आहे असही ते यावेळी म्हणाले आहेत.

क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी कोण घेतले ताब्यात?

आर्यन शाहरुख खान, अरबाज मर्चंट, मोहक जसवाल, गोमित चोप्रा, मूनमून, सारिका, इस्मित सिंह, विक्रात चोकर या सर्वांना जे.जे हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी नेले आहे. दरम्यान, मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या एका क्रुझ शिपवरील हायप्रोफाईल ड्रग्स पार्टी सुरू होती. याम कारवाईध्ये एनसीबीने मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत तीन महिलांसह एकूण 13 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. परंतु, यामध्ये बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन याचे नावही समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

तीन मुलींचा समावेश आहे

या कारवाईत तीन महिलांचा समावेश आहे. या तिन्ही महिला दिल्लीच्या रहिवासी असून उच्चभ्रू व्यावसायिकांच्या मुली असल्याचे समोर आले आहे. एनसीबीने या पार्टीच्या आयोजकांनाही सकाळी साडेअकरा वाजता एनसीबी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले होते. दरम्यान, सहा जणांनी या पार्टीचे आयोजन केल्याचे समजते आहे.

हेही वाचा -ड्रग्स पार्टीवर कारवाई करणारे समीर वानखेडे कोण आहेत? जाणून घ्या त्यांच्याविषयी खास माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details