महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बियर बारमध्ये ATM कार्डांचे क्लोनिंग करून ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढणाऱ्या कॅशियरसह दोन वेटर ताब्यात - beer bar cashier arrested for cloning ATM cards

एका बियर बारच्या कॅशियर व दोन वेटरना ग्राहकांच्या क्रेडिट व डेबिट कार्डचे क्लोनिंग करून त्यांच्या बँक अकाउंटमधून पैसे काढण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहे.

Two waiters and  beer bar cashier arrested for cloning ATM
Two waiters and beer bar cashier arrested for cloning ATM

By

Published : Feb 9, 2021, 6:42 PM IST

Updated : Feb 9, 2021, 6:55 PM IST

मुंबई -एका बियर बारच्या कॅशियर व दोन वेटरना ग्राहकांच्या क्रेडिट व डेबिट कार्डचे क्लोनिंग करून त्यांच्या बँक अकाउंटमधून पैसे काढण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहे.

मुंबईतील मालाड पोलिसांनी तीन बियर बार मधील एका कॅशियर सोबतच 2 वेटर यांना सुद्धा अटक केले आहे. त्यांच्याकडून तीन क्लोनिंग मशीन सोबतच लॅपटॉप, एटीएम कार्ड आणि ग्राहकांचे एटीएम पिन नंबर लिहिलेले कागद सुद्धा हस्तगत करण्यात आले आहेत.

माहिती देताना पोलीस अधिकारी
पोलिसांनी तिन्ही आरोपींवर कलम 419, 420 व 66 क, ड, अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मालाड (प ) चिंचोली बंदरमध्ये राहणाऱ्या राकेश विश्वकर्मा नावाच्या व्यक्तीने तक्रार दाखल केल्यावर ही कारवाई करण्यात आली.

तक्रारकर्त्याने सांगितले की, त्याच्याकडून न वापरताही खात्यातून पैसे कट होत आहेत. बोरिवली पूर्व येथील 24 वर्षीय धर्मेंद्र कुमार सिंह याच्याकडे चौकशी केल्यानंतर ही बाब समोर आली आहे.

Last Updated : Feb 9, 2021, 6:55 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details