ठाणे- ओमीक्रोन व्हेरियंटची जगभरात धास्ती निर्माण होत असताना बेस्ट बस प्रशासनाने ( Best administration on traveling rule ) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बेस्टमधून प्रवास करण्यासाठी दोन लशींचे प्रमाणपत्र बंधनकारक ( vaccination certificates mandatory for Best ) करण्यात आले आहे.
कोरोनाच संकट कमी होत असताना नव्याने आलेल्या ओमीक्रोन व्हेरियंटचा विषाणूचा भारतात शिरकाव ( Omicron virus threat in India ) होण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर बेस्ट प्रशासनाने खबरदारी घेत बस प्रवासासाठी लशींचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे कोरोना लशींचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांनाच ( new rule for best bus journey in Mumbai ) मुंबईच्या बेस्ट बसमध्ये प्रवास करता येणार आहे.
हेही वाचा-Omicron Variant : ओमिक्रॉनसंदर्भात मंत्रिमंडळ बैठक.. परदेशातील प्रवाशांची माहिती गोळा करा, मुख्यमंत्र्याचे निर्देश
प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मुदतवाढीची प्रवाशांना अपेक्षा-
ठाण्यातून हजारो प्रवासी दररोज मुंबईत जाण्यासाठी बेस्टने प्रवास करत असतात. खबरदारी म्हणून बेस्ट प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. मात्र, दोन डोस घेण्यासाठी किंवा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी थोडी मुदत मिळावी अशी अपेक्षा प्रवासी ( Best passengers reactions on new rule ) व्यक्त करत आहेत.
हेही वाचा-Omicron virus threat in Maharahstra : विदेशातून आलेल्या १ हजार पर्यटकांचा शोध सुरू - आदित्य ठाकरे
प्रवाशीदेखील घेत आहेत काळजी-
ठाण्यातील प्रवाशांनी दोन लशींनंतरच बस प्रवास करण्याची परवानगी देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. लशीचे सरकारी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रियादेखील नागरिकांना समजावणे आवश्यक असल्याचे प्रवाशी सांगत आहेत. जर सोप्या पद्धतीने प्रमाणपत्र मिळाले, तर सोयीचे होईल. तसेच तिकीट तपासनीस यांचेदेखील काम सोपे होईल, असे प्रवाशी सांगत आहेत.
हेही वाचा-Rajesh Tope on School Opening : शाळा 1 डिसेंबरपासून सुरू होणार -आरोग्यमंत्री राजेश टोपे
शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्सशी चर्चा करून निर्णय- उद्धव ठाकरे
विदेशातील ओमिक्रॉनच्या विषाणूचा (Omicron Variant) संसर्ग झपाट्याने पसरतो आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली. परदेशातून आलेल्या प्रवाशांची माहिती गोळा करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray on New Corona Variant) यांनी यावेळी दिले. तसेच नियमित प्रवाशांची माहिती मिळाल्यास संसर्ग रोखू शकतो, असा आशावादही व्यक्त केला. दरम्यान, गर्दीचे कार्यक्रम रोखण्यासाठी क्रिसमस पार्टी, थर्टी फर्स्टसाठी नवे नियम लागू करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. तर १ डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याबाबत चाईल्ड टास्क फोर्सची चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
१ हजार विदेशी नागरिकांचा शोध सुरू-
युरोपमधील काही देशांत कोरोनाचा प्रसार वाढला आहे. दक्षिण आफ्रिका व काही देशांत ओमीक्रोन हा व्हेरियंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरचे पालक मंत्री व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिका मुख्यालयात आढावा ( Aditya Thackeray meeting on omicron virus precautions ) बैठक घेतली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, की मागील दहा दिवसात १ हजार विदेशी नागरिक विमानाने आले आहेत. त्यापैकी मुंबईमध्ये किती नागरिक आहेत, त्याचा शोध घेतला जात आहे. त्यांना क्वारंटाईन करण्याचा विचार सुरू आहे. केंद्र सरकारचे निर्देश आल्यास त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.