मुंबई -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्यूकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या आजारावर उपचार घेत असतना सामान्य नागरिकांची अर्थिक बाजू पूर्णपणे खालावत आहे. खासगी रुग्णालयाची बिलं लाखोंच्या घरात आहेत. अशा काळात मुंबईच्या Cathedral and John Connon शाळेची दोन मुलं पुढे सरसावली आहेत. या दोन्ही मुलांनी समोर येत म्यूकरमायकोसिस आजाराच्या उपचारासाठी फंड गोळा करण्याचं काम सुरू केलं आहे. या दोन्ही मुलांची नावं अर्नव गुप्ता आणि रनई लोनकर अशी आहेत.
माहिती देताना अर्नव गुप्ता आणि रनई लोनकर हेही वाचा -पालखी सोहळ्यावर यंदाही कोरोनाचे सावट; उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी बैठक
नागरिकांचा चांगला प्रतिसाद
अर्नव सांगतो की, मागच्या दोन आठवड्यापूर्वी मी माझ्या नाक-कान आणि घशांच्या डॉक्टरकडे रेग्युलर चेक अपसाठी गेलो होतो. त्या ठिकाणी माझ्या डॉक्टरांनी मला म्यूकरमायकोसिस आजाराविषयी सांगितलं. हा आजार किती भयंकर आहे, हा आजार जीवघेणा असल्याचं देखील डॉक्टरांनी सांगितलं. अर्नव सांगतो, घरी आल्यानंतर याची माहिती मी माझा मित्र रनई लोनकर याला सांगितली. आम्ही दोघांनी विचार केला आणि फंड जमा करण्याचं कार्य सुरु केलं. सुरुवातीला एका वेबसाईटच्या मदतीनं आम्ही फंड जमा केला. पहिल्या आठवड्यात सुमारे 1 लाख रुपयांचा फंड गोळा केला. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात ही रक्कम 2.75 लाखांपर्यंत जमली आहे. लोकांना या मदतीचं आवाहान केल्यानंतर जनतेनं चांगला प्रतिसाद दिला आहे. अनेक स्तरातील दानशूर व्यक्तींनी मदत केल्याचं अर्नब सांगतो. जमा झालेली रक्कम नायर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना दिली जाईल, असं अर्नव सांगतो.
हेही वाचा -तौक्ते चक्रीवादळ नुकसानग्रस्तांसाठी राज्य सरकारची 250 कोटींची मदत
कोणत्या बेवसाईडवर पैसे डोनेट कराल
http://impactguru.com/s/dMb5q4