मुंबई मुलुंड येथील एका इमारतीमधील घराचे सीलिंग कोसळले आहे. या दुर्घटनेत २ जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
House Ceiling Collapsed मुलुंड येथे घराचे सीलिंग कोसळून दोघांचा मृत्यू - घराचे सीलिंग कोसळून दोघांचा मृत्यू
मुलुंड येथील एका इमारतीमधील घराचे सीलिंग कोसळले आहे. या दुर्घटनेत २ जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
२ जणांचा मृत्यूमिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड नाना पाडा येथे दोन मजली मोती छाया बिल्डिंग आहे. २० ते २५ वर्षे जुनी असलेल्या या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील घराचे सीलिंग आज रात्री ९ च्या सुमारास कोसळले. यामुळे २ जण जखमी झाले. जखमींना त्वरित आशीर्वाद क्रिटिकल केअर हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र या दोघांचा रुग्णालयात आणण्यापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. देवशंकर नाथालाल शुक्ला वय ९३ वर्षे, अरखीबेन देवशंकर शुक्ला वय ८७ वर्षे अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान या प्रकरणी पालिकेने कलम ३५१ नुसार नोटीस दिली असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.