मुंबई- सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून ड्रग सिंडीकेट प्रकरणी तपास सुरू आहे. या संदर्भात एनसीबीकडून हरीस खान या अमली पदार्थ तस्करासह 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे. याबरोबरच एनसीबीकडून मुंबईतील अंधेरी लोखंडवाला व बांद्रा परिसरामध्येसुद्धा छापेमारी करण्यात आलेली होती.
मुंबईत एनसीबीची छापेमारी; 2 आरोपींना अटक - Sushant Singh Rajput latest news
एनसीबीकडून अमली पदार्थ तस्कर हरीस खान यास अटक करण्यात आलेली असून सदरचा आरोपी या अगोदर अटक करण्यात आलेल्या चिंकू पठाण उर्फ परवेज खान याचा हस्तक असल्याचे समोर आले आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी तपास
एनसीबीकडून अमली पदार्थ तस्कर हरीस खान यास अटक करण्यात आलेली असून सदरचा आरोपी या अगोदर अटक करण्यात आलेल्या चिंकू पठाण उर्फ परवेज खान याचा हस्तक असल्याचे समोर आले आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी हरीस खान याचा कशा प्रकारे सहभाग आहे याचा तपास एनसीबी करत आहे. काही दिवसांअगोदर सुशांत सिंग राजपूत यांचा रूममेट सिद्धार्थ पिठानी यास हैदराबाद येथून अटक करून एसीबीने मुंबईत आणले होते. न्यायालयाने त्याची रवानगी 4 जूनपर्यंत एनसीबी कोठडीत करण्यात आलेली आहे.