महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Penguin Mumbai : राणीबागेतील पेंग्विनच्या बारशाचा कार्यक्रम रद्द !

मुंबईतील राणीच्या बागेतील पेंग्विन हे नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहेत. राणीबागेतील पेंग्विनने दोन पिलांना (Two Penguin Chicks) जन्म दिला आहे. त्यांचे आज (बुधवार) नामकरण केले जाणार होते. मात्र पेंग्विनच्या बारशाचा हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईत पेंग्विन चर्चेत आले आहेत.

Two Penguin Chicks name ceremony
पेंग्विन पिलांचा नामकरण सोहळा रद्द

By

Published : Dec 22, 2021, 8:50 PM IST

Updated : Dec 22, 2021, 9:13 PM IST

मुंबई - मुंबईतील पर्यटनामध्ये सध्या प्रसिद्ध आणि बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण असलेल्या राणीबागेत (Rani Baug) पेंग्विनने (Penguin) दोन पिलांना जन्म दिला आहे. ही पिल्ले आत मोठी झाली असून आज या पिलांची नावे ठेवली जाणार होती. यासाठी राणीबाग प्रशासनाकडून तयारीही पूर्ण झाली होती. महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या उपस्थितीत पेंग्विनच्या पिल्लांचे बारसे होणार होते. मात्र कोणतेही कारण न देता हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

राणीबागेत पेंग्विनचा जन्म -
राणी बाग म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रालयात (Veer Mata Jijabai Bhosale Udyan And Zoo) २६ जुलै २०१६ रोजी ८ पेंग्विन आणण्यात आले. त्यानंतर लगेच एका पेंग्विनचा मृत्यू झाला होता. राणीबागेतील दोन पेंग्विन माद्यांनी पिल्लांनाही जन्म दिला आहे. डेसी नावाच्या मादीने अंडी दिली होती. त्यातून एक मे २०२१ मध्ये एका पिल्ल्याचा जन्म झाला. तर फ्लिपर नावाच्या मादीच्या अंड्यातून १९ ऑगस्ट २०२१ मध्ये अजून एका पिल्लाचा जन्म झाला. त्यामुळे राणीबागेतील पेंग्विनची संख्या आता नऊ झाली आहे.

हेही वाचा : Fact Check : राणीबागेचे नाव बदलल्याच्या अफवाच!


राणीबागेतील प्रथा-परंपरेनुसार पेंग्विन पिल्लांचे नामकरण -
राणीबागेतील हत्तींची अनारकली व लक्ष्मी तर एका गेंड्याचे शिवा हे नामकरण करण्यात आले होते. त्याप्रमाणे आता पेग्विन पिल्लांचे नामकरण करण्यात येणार होते. आज त्यासाठी नामकरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या नामकरणासाठी पाहुणे म्हणून महापौर किशोरी पेडणेकर यांना निमंत्रण देण्यात आले होते. राणीबागेत अशा महापौरांच्या उपस्थितीत असा नामकरण सोहळा प्रथमच होणार होता. मात्र अचानक हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. हिवाळी अधिवेशनामुळे (Maharashtra Assembly Winter Session 2021) बारशाचा कार्यक्रम लांबणीवर पडल्याचे समजते.
हेही वाचा : मग अमृता फडणवीस यांना विरोधी पक्ष नेत्या करणार का? महापौरांचा चंद्रकांत पाटलांना सवाल



पेंग्विन वरून टिका -
राणीबागेत पेंग्विन आल्यावर एका पेंग्विनचा मृत्यू झाला होता. तसेच पेंग्विन कक्ष (Penguin Center) उभारण्याचे काम एका काळ्या यादीतील कंत्राटदाराला देण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावरून सत्ताधारी आणि पालिका(BMC) प्रशासनावर टीकेची झोड उठवली गेली होती. पेंग्विनच्या वाढत्या देखभाल खर्चावरून शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) व शिवसेनेला भाजपसह (BJP) विरोधकांकडून लक्ष्य केले गेले आहे. आता पेंग्विनचे बारसे केले जाणार असल्याने या सोहळ्यावरून विरोधकांना पुन्हा टीकेची संधी चालून आली आहे.

पेंग्विनच्या खर्चावरुन पालिकेवर झाली होती टिका

पेंग्विनवर होणाऱ्या खर्चावरुन शिवसेना आणि मुंबई महापालिका प्रशासनावर विरोधकांकडून अनेकदा टिका करण्यात आली आहे. शिवसेनेचे नेते आणि सध्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून पेंग्विन आणण्यात आले. त्यासाठी वातावरण निर्मिती करण्यात आली. त्यानंतर एका पेंग्विनचा मृत्यू झाला त्यावेळीही राजकारण करण्यात आले. पेंग्विनमुळे पालिकेचे उत्पन्न वाढत असून खर्चही वाढत आहे. पेंग्विनमुळे मुंबईची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. पेंग्विनवर मोठ्या प्रमाणात खर्च होतो, असे विरोधकांना वाटत असेल तर त्यावर नक्की तोडगा काढला जाईल. मात्र, पेंग्विनवर तडजोड होणार नाही, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले होते.

पेंग्विन्सच्या देखभालीवर कोट्यवधींचा खर्च

  • एका दिवसाचा एका पेंग्विनवरचा खर्च - 20 हजार
  • एका दिवसाचा 7 पेंग्विनवरचा मिळून खर्च - दीड लाख
  • एका महिन्याचा एका पेंग्विनसाठी खर्च - 6 लाख
  • एका महिन्याचा 7 पेंग्विनचा खर्च - 42 लाख
  • एका वर्षाचा एका पेंग्विनसाठीचा खर्च - 71लाख
  • एका वर्षाचा 7 पेंग्विनवरचा खर्च - 5 कोटी
  • एकूण 3 वर्षांसाठी 7 पेंग्विनवरचा खर्च - 15 कोटी
Last Updated : Dec 22, 2021, 9:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details