मुंबई-मुंबईकरांना मराठी नवीन वर्षानिमित्ताने मोठी भेट मिळणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुढी पाडव्याला मुंबई मेट्रोच्या दोन नव्या लाईनचे उद्घाटन होणार आहे.
तब्बल ८ वर्षानंतर मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो ७' ( Metro 2A ) आणि 'मेट्रो २ए' ( Metro 7 ) या नव्या मार्गिका येणार आहेत. यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून ( traffic congestion in Mumbai ) सुटका होणार आहे. मुंबईतील नागरिकांना दोन नव्या मेट्रो मार्गिका मिळणार ( two new metro lines in Mumbai ) आहेत. या दोन्ही मार्गिकांचे खास वैशिष्ट्य म्हणजे या मेट्रो विना ड्रायव्हर ( driverless metro in Mumbai ) असणार आहेत. काही दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांनी या मेट्रोचे ट्रायलरन्स मध्ये सहभाग घेतला होता. मुंबईमध्ये मेट्रो ७ आणि २ ए या मार्गावर एकत्रिपणे पहिल्या टप्प्यामध्ये २० किलोमीटर धावणार आहे. त्यानंतर या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात १५ किमी धावणार आहे. मुंबई 'मेट्रो ७' चे तिकिट किमान १० रुपये असणार आहे. कमाल दर ८० रुपये असणार आहेत.
हेही वाचा-Families Boycott Yavatmal : धक्कादायक! अत्याचाराला कंटाळून साठ कुटुंबाचे जंगलात वास्तव्य