मुंबई - कोरोनामुळे मुंबई पोलीस खात्यातील आणखीन 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील पार्क साईट पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका 57 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर सहार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे मुंबई पोलीस खात्यातील आणखी 2 पोलिसांचा मृत्यू - मुंबई कोरोना अपडेट
राज्यात कोरोनामुळे 14 पोलिसांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त पोलिसांच्या संख्येत 60 ने आणखीन भर पडली असून महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्या 1388 पर्यंत पोहचली आहे.
mumbai police
राज्यात कोरोनामुळे 14 पोलिसांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त पोलिसांच्या संख्येत 60 ने आणखीन भर पडली असून महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्या 1388 पर्यंत पोहोचली आहे. यात 142 पोलीस अधिकारी तर 1246 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असून 428 पोलीस कर्मचारी कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबई पोलीस खात्यात 650 पोलिसांना कोरोणची बाधा झाली असून यात 191 पोलीस कर्मचारी बरे होऊन पुन्हा कामावर हजर झाले आहेत.