मुंबई -मुंबईतील वांद्रे आणि सांताक्रूझ भागातील दोन मशिदींनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही मशिदींविरुद्ध गुन्हा दाखल ( Two Mosques Filed Charges in Mumbai ) केला आहे. खरे तर सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत कोणी स्पीकर वाजवत असेल तर त्याने ठरवून दिलेल्या डेसिबलच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र मुंबईतील दोन मशिदींनी त्याचे पालन केले नाही, या आरोपावरून पोलिसांनी वांद्रे येथील नूरानी मशीद ( Noorani Mosque ) आणि सांताक्रूझ येथील कब्रस्तान मशिदीविरुद्ध गुन्हा दाखल ( Charges filed against cemetery mosque Mumbai ) केला आहे.
या कलमांतर्गत गुन्हा दाखल - वांद्रे येथील नूरानी मशिदीच्या व्यवस्थापनावर सुप्रीम कोर्टाच्या नियमांचे पालन न केल्याचा आरोप आहे. यामुळे वांद्रे पोलिसांनी मशिदीच्या व्यवस्थापनाविरुद्ध IPC च्या कलम १८८ आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७ (१), (३), १३५ आणि कलम ३३ (आर) (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर, सांताक्रूझ पोलिसांनी लिंक रोडवर असलेल्या कब्रस्तान मशिदीशी संबंधित लोकांवरही नियमांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
म्हणून पोलिसांची कारवाई -पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी म्हणजे 5 तारखेला सकाळी वांद्रे इथल्या नूरानी मशीदमध्ये भोंग्यांवर नमाज अदा करण्यात आली. पहाटे सहा वाजण्याच्या आधी भोंग्याचा अथवा लाऊडस्पीकरचा कोणताही वापर न करता नमाज अदा करावी अशा सूचनाच पोलिसांनी एक दिवस अगोदर दिल्या होत्या. मात्र, पोलिसांच्या सूचनांकडे कानाडोळा करत मशिदीत सकाळच्या आजारांसाठी भोंग्याचा वापर करण्यात आला. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.