महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sharad Pawar Meet CM : सरकार वाचवण्यासाठी शरद पवार उतरले मैदानात; बंददाराआड मुख्यमंत्र्यांसोबत दोन तास चर्चा - अजित पवार

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी घेतलेल्या भमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. मात्र आता यातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वतः मैदानात उतरले आहेत. आज त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थान मातोश्री येथे त्यांची भेट घेतली. ( Sharad Pawar and Uddhav Thackeray Meeting ) सायंकाळी साडेसहा वाजता ही भेट झाली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार संजय राऊत आणि अनिल देसाई उपस्थित होते.

Sharad Pawar and Chief Minister Uddhav Thackeray
बंददाराआड मुख्यमंत्र्यांसोबत दोन तास चर्चा

By

Published : Jun 24, 2022, 9:49 PM IST

Updated : Jun 24, 2022, 10:41 PM IST

मुंबई - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी घेतलेल्या भमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. मात्र आता यातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वतः मैदानात उतरले आहेत. आज त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थान मातोश्री येथे त्यांची भेट घेतली. सायंकाळी साडेसहा वाजता ही भेट झाली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार संजय राऊत आणि अनिल देसाई उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंड कसे क्षमवता येईल यावर चर्चा झाली. तसेच एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्यासाठीची रणनीती यावेळी आखण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. ( Sharad Pawar and Uddhav Thackeray Meeting )

शरद पवारांनी दिला सल्ला - 21 जूनच्या रात्रीपासून बंडखोर आमदार घेऊज एकनाथ शिंदे आधी सुरत आणि नंतर गोवाहाटीला गेले. जवळपास चार दिवस उकटले आहेत. अजून काही दिवस हे प्रकरण शिवसेनेने ताणून धरले पाहिजे. जेणेकरून गेलेल्या आमदारांचा संयमाची कसोटी लागेल. तसेच गेले चार दिवस शिवसेना शांत होती मात्र आता शिवसेनेने ही लढाई रस्त्यावर उतरून लढली पाहिजे असा सल्ला या बैठकीतून शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला असल्याची माहिती मिळत आहे.

Last Updated : Jun 24, 2022, 10:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details