मुंबई : राज्यात सुरु असलेल्या राजकीय लढाईच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली ( Pravin Darekar Demands Presidential Rule ) आहे. मात्र दुसरीकडे भाजप नेते आशिष शेलार यांनी अशी कुठलीही मागणी भाजपकडून करण्यात आली नसल्याचे ( Ashish Shelar Declined Presidential Rule Demand ) सांगितले. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट ( Presidential Rule Maharashtra ) लागू करण्याच्या मागणीवरून भाजपात दोन गट पडल्याचे दिसत आहे.
दरेकर म्हणाले :भाजपने सुरू केलेल्या पोल-खोल अभियानाच्या ( Mumbai BJP Polkhol Abhiyan ) विरोधात शिवसेना गुंडगिरी करत आहे. तसेच अभियान उधळून लावण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केला. मुंबईतील भाजपाच्या पोल-खोल अभियाना विरोधात सातत्याने त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांच्या नजरेसमोर गुंडगिरी सुरू असल्याचा आरोप दरेकर यांनी केला. मुंबईतील कांदिवली, चेंबूर, गिरगाव येथे शिवसैनिकांकडून उघडपणे गुंडगिरी केली जात असतानाही पोलीस डोळेझाक करत आहेत. त्यामुळे ही सरकार पुरस्कृत गुंडगिरी असल्याचा आरोपही दरेकर यांनी यावेळी केला. तर मोहित कंबोज यांच्यावर झालेला हल्ला निषेधर्य आहे. भाजप जोरदार प्रत्युत्तर देईल मात्र लोकशाहीच्या मार्गाने असे दरेकर यांनी यावेळी सांगितले.
ठोकशाहीला ठोकशाहीने उत्तर - शेलार :भाजपा नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा निषेधार्ह ( Attack On Mohit Kamboj Vehicle ) आहे. झुंडशाहीच्या माध्यमातून मोहित कंबोज यांचा बळी घेण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप भाजपा नेते अशिष शेलार यांनी केला आहे. एक त्याच्या गाडीवर पंचवीस लोक येत असतील तर, असे तुमच्या बाबतीतही घडू शकते, असा गर्भित इशाराही यावेळी शेलार यांनी दिला. भारतीय जनता पार्टी लोकशाही मानणारी आहे. लोकशाहीला आम्ही लोकशाहीने उत्तर देऊ. मात्र ठोकशाहीला ठोकशाहीनेच उत्तर देऊ, असेही शेलार यावेळी म्हणाले.