मुंबई - प्रभादेवी येथील साई भक्ती मार्गावर असलेल्या ओंकार इमारतीचे दोन मजले कोसळले आहेत. आज (गुरुवार) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
जयप्रभा आणि ओंकार या दोन इमारती तळमजल्यासह तीन मजली इमारती एकमेकांना लागून आहेत. या दोन्ही इमारती जुन्या आहेत. गेले 2 दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ओंकार इमारतीतील दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील भाग कोसळला. यावेळी घरात लोक राहत होते. घटना घडताच रहिवाशांनी इमारती खाली धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि महानगरपालिका अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.