मुंबई : गणेशोत्सव काळात लालबाग येथे मोठ्या प्रमाणावर भाविक लालबागच्या राजासाठी Mobile Phone Theft Lalbagh तसेच गणेश गल्लीतल्या मुंबईचा राजा तेजुकाया मेन्शन चिंचपोकळीचा चिंतामणी आधी गणेश मंडळांच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात. यादरम्यान होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे भाविकांचे खिसे मोबाईल सोन्याचे दागिने आणि मौल्यवान वस्तू ( valuables theft Lalbagh Mumbai ) यांच्यावर डल्ला मारतात. मात्र, यंदा गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी काळाचौकी पोलीस ठाण्यात केवळ बारा मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असल्याची माहिती काळाचौकी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गुंड यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. मात्र, झारखंडच्या दोघांना काळाचौकी पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Mobile Phone Theft Lalbagh लालबागमध्ये भाविकांच्या गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक - Lalbagh mobile theft
गणेशोत्सव काळात लालबाग येथे मोठ्या प्रमाणावर भाविक लालबागच्या राजासाठी Mobile Phone Theft Lalbagh तसेच गणेश गल्लीतल्या मुंबईचा राजा तेजुकाया मेन्शन चिंचपोकळीचा चिंतामणी आधी गणेश मंडळांच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात. यादरम्यान होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे भाविकांचे खिसे मोबाईल सोन्याचे दागिने आणि मौल्यवान वस्तू ( valuables theft Lalbagh Mumbai ) यांच्यावर डल्ला मारतात.
भाविकांच्या मौल्यवान वस्तूंवर चोरांचा डोळा -गणपती बाप्पाची पंढरी समजल्या जाणाऱ्या लालबाग परिसर गणेशोत्सव काळात भाविकांच्या अलोट गर्दीने दुमदुमून जातो. आज गणेशोत्सवाचा पाचवा दिवस असून काल शनिवार असल्याने रात्री भाविकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. याच गर्दीचा फायदा घेऊन चोरटे आणि समाजकंटक भाविकांचे मोबाईल पाकीट आधी मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारतात याबाबत काही भाविक काळाचौकी पोलीस ठाण्यात अथवा लालबाग पोलीस चौकी किंवा तेथे असलेल्या पोलिसांकडे याबाबत तोंडी तक्रार करतात. तर काहीजण याबाबत लेखी तक्रार करतात. यंदा पाचव्या दिवशी पर्यंत काळाचौकी पोलीस ठाण्यात केवळ बारा मोबाईल गहाळ झाल्याची नोंद असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गुंड यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
महिलांशी संबंधित गुन्हे शून्यावर -अद्यापपर्यंत सोन्याच्या वस्तू चोरीस जाणे पाकीट मारी विनयभंग मारहाण आणि धक्काबुक्की यासारखे तत्सम तक्रारी अथवा गुन्हे दाखल झाले नसल्याची माहिती देखील गुंड यांनी दिली. तसेच चिंचपोकळीचा चिंतामणी मंडळाच्या कार्यकर्त्याने काल रात्रीचे गणेश भक्ताला केलेल्या धक्काबुक्की मारहाण प्रकरणी देखील अद्याप कोणतीही तक्रार अथवा गुन्हा नोंद नसल्याची त्यांनी माहिती दिली. झारखंडहून आलेल्या लालबागमध्ये गणेशोत्सवादरम्यान उसळणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन मोबाईलवर डल्ला मारण्यासाठी आलेल्या दोन चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांनी किती मोबाईल चोरी केले आणि त्यांची मोडस ऑपरेंडी काय होती याबाबत अद्याप माहिती प्राप्त असल्याचे पोलिसांनी सांगितले.