मुंबई - कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी लागणारे औषध बनावट तयार करून नागरिकाच्या जीवाशी खेळ करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन व मुंबई पोलिसांच्या टीमने कोरोनावरील औषध फॅविपीरावीर (favipiravir) गोळ्यांचे डुबलीकेट तयार करून विकणाऱ्याला अटक केली आहे. सुदीप मुखर्जी आणि संदीप मिश्रा असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी बनावट औषधे तयार करणाऱ्या दोघांना अटक - कोरोना उपचार
कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी लागणारे औषध बनावट तयार करून नागरिकाच्या जीवाशी खेळ करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन व मुंबई पोलिसांच्या टीमने कोरोनावरील औषध फॅविपीरावीर (favipiravir) गोळ्यांचे डुबलीकेट तयार करून विकणाऱ्याला अटक केली आहे.
संदीप मिश्रा हा डुबलीकेट गोळ्या यूपीच्या मेरिटमध्ये तयार करून दिल्ली येथील प्रसिद्ध औषध विक्रेता होलसेलर सुदीप मुखर्जीला देत होता. त्याच्यानंतर मुखर्जी वेगवेगळ्या राज्यांमध्ये याचा पुरवठा करत होता. त्याच्यावर हिमाचल प्रदेशमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समतानगर पोलिसानी या आरोपींकडून 22 लाखांची बनावट औषधे जप्त केली आहेत. तसेच यामध्ये आणखी कोणी सहभागी आहेत का यांचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव हाके यांनी सांगितले.