मुंबई -बुली बाई ॲप प्रकरणातील ( Bully Bai App Case ) दोन आरोपींना वांद्रे न्यायालयाने ( Bandra Court ) 14 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ( Remanded Police Custody ) सुनावण्यात आली आहे. श्वेता सिंग व मयंक रावल, असे त्या आरोपींचे नाव आहे. त्यांना यापूर्वीही चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती.
बुली बाई ॲप प्रकरणातील आरोपींना मुंबई पोलिसांनी ( Mumbai Police ) उत्तराखंडमधून 7 जानेवारीला मुंबईत आणले होते. त्यावेळी या दोन आरोपी श्वेता सिंग, मयंक रावल यांना वांद्रे न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. सोमवारी (दि. 10 जानेवारी) त्यांची पोलीस कठडी संपली असता त्यांना पुन्हा वांद्रे न्यायालयात हजर केले होते. त्यावर न्यायाधीशांनी पोली कोठडीत पुन्हा चार दिवसाची वाढ करुन 14 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर विशाल कुमार झा याला 24 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी पाठवण्याचा आदेश ( Judicial Custody ) बांद्रा न्यायालयाने दिला आहे.