महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

चेंबूरमध्ये अल्पवयीन मुलीवर 2 नराधमांचा बलात्कार; आरोपींना अटक - minor girl physical abused chembur

चेंबूर विभागातील वाशीनाका परिसरात एका अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

chembur police
चेंबूरमध्ये अल्पवयीन मुलीवर 2 नराधमांचा बलात्कार

By

Published : Feb 2, 2020, 4:18 AM IST

मुंबई - चेंबूर विभागातील वाशीनाका परिसरात एका अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी भगीरथ उर्फ रॉक किसन जेठे (वय 25) आणि सनी रमेश पाटील (वय 24) यांना अटक केली.

चेंबूरमध्ये अल्पवयीन मुलीवर 2 नराधमांचा बलात्कार

पीडित अल्पवयीन मुलगी ही वाशीनाका या ठिकाणी राहते. 30 जानेवारीला रात्री दहा वाजेच्या सुमारास ही मुलगी घराबाहेर असताना याच परिसरात राहणाऱ्या ओळखीच्या आरोपीनी तिला फूस लावली आणि पूर्व मुक्त मार्गजवळ असलेल्या निर्मनुष्य ठिकाणी नेले. त्यानंतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. झालेला प्रकार या मुलीने आपल्या पालकांना सांगितला. त्यांनी आरसीएफ पोलीस ठाण्यात पीडित मुलीला घेऊन तक्रार दाखल केली.

पोलिसांनी लगेच तपास करत आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपीतील भगीरथ उर्फ रॉक याच्यावर आरसीएफ पोलीस ठाण्यात यापूर्वी मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. बलात्कार गुन्ह्यासंदर्भात पुढील तपास सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत देसाई यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details