महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत 80 टक्के हेरॉईनचा पुरवठा करणाऱ्या 2 आरोपींना अटक - Drug

मुंबईत ब्राऊन शुगर, हेरॉईन यांसारख्या उच्च प्रतीच्या व महागड्या अमली पदार्थांचा 80 टक्के पुरवठा करणाऱ्या टोळीतील 2 मुख्य अमली पदार्थ वितरक आरोपींना अमली पदार्थ विरोधी पथकाच्या बांद्रा युनिटने अटक केली आहे.

accused arrested for supplying heroin in Mumbai
मुंबईत हेरॉईनचा पुरवठा करणाऱ्या 2 आरोपींना अटक

By

Published : Jan 6, 2020, 7:42 PM IST

मुंबई -गेल्या काही महिन्यांपासून मुंबई पोलीस व अमली पदार्थ विरोधी पथक यांच्याकडून मुंबईतील वेगवेगळ्या परिसरात अमली पदार्थ तस्करांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. मात्र मुंबईत ब्राऊन शुगर, हेरॉईन यांसारख्या उच्च प्रतीच्या व महागड्या अमली पदार्थांचा 80 टक्के पुरवठा करणाऱ्या टोळीतील 2 मुख्य अमली पदार्थ वितरक आरोपींना अमली पदार्थ विरोधी पथकाच्या बांद्रा युनिटने अटक केली आहे.

मुंबईत हेरॉईनचा पुरवठा करणाऱ्या 2 आरोपींना अटक...

हेही वाचा... भंडाऱ्यात महाप्रसादातून 80 पेक्षा अधिक भाविकांना विषबाधा

पोलिसांनी या प्रकरणी 4 जानेवारी रोजी मालाड परिसरात राहणाऱ्या राजेश तुलसीदास जोशी (50) या आरोपीला तब्बल 8 कोटी रुपयांच्या किलो हेरॉईन सोबत अटक केली आहे. या बरोबरच या प्रकरणातील आणखीन एक मुख्य आरोपी कृष्णमूर्थी मुत्तीस्वामी कावंडर या आरोपीलाही तब्बल 4 कोटी रुपयांच्या 2 किलो हेरॉईन सोबत अटक केली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी मालाड पश्चिम येथील रेल्वे स्थाकाजवळ सापळा रचला होता.

हेही वाचा... सोने महागले! प्रति तोळा ८५७ रुपयाने वाढून 'एवढी' झाली किंमत

फेरीवल्याचा वेषांतर केलेल्या पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले होते. हे दोन्ही आरोपी मुंबईतील अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या एजंटला ब्राऊन शुगर व कोकेन या अमली पदार्थांचा पुरवठा करण्यासाठी आले असता, पोलिसांनी त्यांना अटक केली.

केवळ दोन तासांच्या आता पोहोचवायचे अमली पदार्थ...

अमली पदार्थांच्या तस्करीसाठी मुंबईत अमली पदार्थ उत्पादक, वितरक, अमली पदार्थ तस्कर व त्याचे सेवन करणारे असे चार गोष्टी सतर्क आहेत. अमली पदार्थांचे उत्पादक बाहेरील राज्यातील असल्याने पोलिसांना त्यांच्या पर्यंत पोहचणे थोडे कठीण जात आहे. मात्र मुंबईतील त्यांच्या वितरकांच्या हालचालींवर अमली पदार्थ विरोधी पथक लक्ष ठेवून होते.

हेही वाचा... राजू शेट्टींनी कर्जमाफीवरून अजित पवारांना 'त्या' विधानाची करून दिली आठवण

अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे मुंबईतील मुख्य वितरक असून बाहेरील राज्यातून आलेले अमली पदार्थ मुंबईतील एका सेफ हाऊसमध्ये आणून त्याची मागणीनुसार पॅकिंग करून अमली पदार्थ तस्करांकडे केवळ दोन तासांच्या आत पोहचवले जात होते. मुंबईत ब्राऊन शुगर , हेरॉईन सारख्या अमली पदार्थाचे 80 टक्के वितरण हे दोन्ही आरोपी गेल्या अनेक वर्षांपासून करीत आले आहेत. दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी एकूण 12 कोटी रुपयांचे 6 किलो हेरॉईन जप्त केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details