मुंबई- राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे ट्विटर अकाऊंट ट्विटरने अनिश्चित काळासाठी बंद केले आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या समर्थनात आपण ट्विट केल्यामुळे आपलं ट्विटर अकाउंट बंद करण्यात आले असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
दिल्लीतील कथित बलात्कार आणि हत्या प्रकरणात पीडित असलेल्या नऊ वर्षाच्या बालिकेच्या पालकांनी दिल्लीत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी आपल्याला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासंदर्भात विनंती केली होती. मात्र या भेटी दरम्यान काढण्यात आलेले फोटो राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले होते. त्यानंतर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने ट्विटर आणि दिल्ली पोलिसांकडे याबाबत कारवाई करण्याची मागणी केली होती.
बाळासाहेब थोरात यांच्यावर ट्विटरची कारवाई, अकाऊंट अनिश्चित काळासाठी केले बंद - काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा आरोप
राहुल गांधी यांच्या समर्थनात ज्या काँग्रेस नेत्यांनी ट्विट केले, त्यांचे ट्विटर अकाऊंट देखील ट्विटरकडून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे. त्यामध्ये बाळासाहेब थोरात यांनी देखील राहुल गांधी यांच्या समर्थनात ट्विट केलं होते, म्हणूनच आपले अकाउंट ही बंद करण्यात आले असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
या कारवाईच्या पत्रानंतर ट्विटरने राहुल गांधी यांचे ट्विटर अकाउंट अनिश्चित काळासाठी बंद केले. मात्र त्यानंतर राहुल गांधी यांच्या समर्थनात ज्या काँग्रेस नेत्यांनी ट्विट केले, त्यांचे ट्विटर अकाऊंट देखील ट्विटरकडून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे. त्यामध्ये बाळासाहेब थोरात यांनी देखील राहुल गांधी यांच्या समर्थनात ट्विट केलं होते, म्हणूनच आपले अकाउंट ही बंद करण्यात आले असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
या आधी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ मुंबई काँग्रेसच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंट वरून ट्वीट करण्यात आले होते. त्यामुळे मुंबई काँग्रेसचे ट्विटर अकाऊंट देखील ट्विटरकडून बंद करण्यात आले असल्याचा आरोप मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी केला होता.