मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधींचे ट्विटर अकाऊंट लॉक केल्यानंतर राहुल गांधींच्या समर्थनार्थ ट्विट करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचे अकाउंट बंद करण्याची कारवाई ट्विटरकडून करण्यात आली आहे. त्यामुळे ट्विटर इंडियाने त्यांची ब्लॉक पॉलिसी नेमकी काय आहे हे जाहीर करावे? अशी मागणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
ट्विटरने आपली ब्लॉक पॉलिसी जाहीर करावी, नवाब मलिकांची मागणी - twitter should announce its block policy
काँग्रेस खासदार राहुल गांधींचे ट्विटर अकाऊंट लॉक केल्यानंतर राहुल गांधींच्या समर्थनार्थ ट्विट करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचे अकाउंट बंद करण्याची कारवाई ट्विटरकडून करण्यात आली आहे. त्यामुळे ट्विटर इंडियाने त्यांची ब्लॉक पॉलिसी नेमकी काय आहे हे जाहीर करावे? अशी मागणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
बलात्कार पीडित मुलीच्या पालकांचे फोटो ट्विटरवरून शेअर केल्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांवर ही कारवाई करण्यात आल्याचे ट्विटरकडून सांगण्यात आले आहे. या कारवाईनंतर
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटरच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत ट्विटरने आपली ब्लॉक पॉलिसी जाहीर करावी अशी मागणी केली आहे. मागील काही दिवसांत ट्विटर व केंद्रसरकारमध्ये वाद उफाळून आला होता. त्यानंतरच विरोधी पक्षांच्या नेत्यांचे ट्विटर हँडल ब्लॉक होत आहेत आणि हे दबावाखाली होत आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.
राष्ट्रवादी शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष
राष्ट्रवादी कॉंग्रेस शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. त्यांच्या ठरलेल्या धोरणानुसार आम्ही राजकारण करतो. मात्र राज ठाकरे यांना हे माहीती नसावे किंवा जातीव्यवस्थेचा इतिहास माहिती नसावा म्हणून ते अशा प्रकारचे वक्तव्य करत असल्याचा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस राजकारणात आल्यानंतर जातीजातींमध्ये तणाव निर्माण झाला असे वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. त्या वक्तव्याला नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
हेही वाचा -एका फ्लॅट मालकाला एकापेक्षा जास्त वाहने पार्किंगची परवानगी देऊ नये - मुंबई उच्च न्यायालय