महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ई टीव्ही भारत स्पेशल : मुंबईतील बेस्टचे २० हजार विजेचे खांब धोकादायक अवस्थेत - mumbai best news

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात इमारतींचा भाग कोसळणे, झाडं आणि झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडतात. त्यात लोकं जखमी होतात, काहींचा मृत्यूही होतो. मुंबईत अशा घटना दरवर्षी घडतात. त्यातच आता मुंबई शहरात रस्त्यावर बेस्ट उपक्रमाकडून लावण्यात आलेले खांब धोकादायक झाल्याचे समोर आले आहे.

electric poles
मुंबईतील बेस्टचे २० हजार विजेचे खांब धोकादायक अवस्थेत

By

Published : Sep 1, 2020, 4:01 PM IST

मुंबई - दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत घर, इमारत कोसळणे, झाडाच्या फांद्या रस्त्यावर पडणे यासारख्या दुर्घटना घडतात. याचबरोबर आता मुंबई शहरात रस्त्यावर लावण्यात आलेले तब्बल २० हजार विजेचे खांब धोकादायक स्थितीत असल्याचे उघड झाले आहे. या विजेच्या खांबांचे आयुर्मान संपले असून, ते पडल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने ते खांब त्वरित बदलावेत, अशी मागणी बेस्ट समिती सदस्य सुनिल गणाचार्य यांनी केली आहे.

प्रतिनिधी अजयकुमार जाधव यांनी घेतलेला आढावा...

हेही वाचा -दूरसंचार कंपन्यांना 'सर्वोच्च' दिलासा; थकित एजीआर शुल्क भरण्याकरता १० वर्षांची मुदत

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात इमारतींचा भाग कोसळणे, झाडं आणि झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडतात. त्यात लोकं जखमी होतात, काहींचा मृत्यूही होतो. मुंबईत अशा घटना दरवर्षी घडतात. त्यातच आता मुंबई शहरात रस्त्यावर बेस्ट उपक्रमाकडून लावण्यात आलेले खांब धोकादायक झाल्याचे समोर आले आहे. मुंबईत बेस्टचे रस्त्यावर ३३ हजार ३६३ विजेचे खांब आहेत. त्यापैकी वयोमर्यादा संपलेले धोकादायक २० हजार ७६ खांब आहेत. विजेचे खांब बंद पडल्याची तक्रार आल्यास तक्रार निवारणासाठी यापूर्वी लायटर फिरत असे. परंतु, बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागात हे पदच आता अस्तित्वात राहिलेले नाही.

मुंबई शहरातील अनेक पोल बंद पडत असून, काही ठिकाणचे पोल तातडीने बदलणे गरजेचे असल्याचे गणाचार्य यांनी म्हटले आहे. बेस्ट उपक्रमात कामगार कपातीचे धोरण राबवले जात असून, कंत्राटी पद्धतीवर भर दिला जात आहे. बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागात कामगारांचा अभाव असून, कंत्राटदार आपल्या मर्जीनुसार काम करतात. कंत्राटदारांची काम करण्याची पात्रता नाही. मुंबई शहरात बेस्ट वीज पुरवठा करत असून, वीज खांबं दुरुस्ती अथवा नवीन टाकल्यावर त्याचे बिल मुंबई महापालिकेला देणे बेस्ट उपक्रमाला बंधनकारक आहे. परंतु, बेस्ट उपक्रमाकडे कर्मचारी वर्गच नाही, तर पालिका प्रशासनाला बिल कुठून देणार. एकूणच मुंबई महापालिका व बेस्ट उपक्रम या दोघांत समन्वय नसून, बेस्ट उपक्रमात 'हम करे सो कायदा', असा कारभार सुरू आहे. भविष्यात धोकादायक वीजेचा खांब पडून काही दुर्घटना घडल्यास त्याला मुंबई महापालिका प्रशासन व बेस्ट उपक्रमच जबाबदार असेल, असा आरोप बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी केला आहे.

दरम्यान, याबाबत बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांच्याशी संपर्क साधला असता, बंद पडलेले अथवा जंग पकडलेले विजेचे खांब बदलण्यास बेस्ट समितीची मंजुरी मिळाली आहे. यासाठी आता निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरच धोकादायक विजेचे खांब बदलण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.

  • रस्त्यावरील एकूण खांब - ३३, ३६३
  • वयोमर्यादा संपलेले धोकादायक खांब - २०,०७६

ABOUT THE AUTHOR

...view details