मुंबई- विधानसभेच्या अधिवेशनात गोंधळ घालणाऱ्या भाजपच्या बारा आमदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर आज ( 10 जानेवारी) विधानभवनात सुनावणी झाली. विधानसभा उपाध्यक्षांच्या उपस्थितीत झालेल्या सुनावणीवेळी कोणताही तोडगा निघाला नाही. येत्या दोन दिवसांत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी ( Supreme Court hearing on Twelve MLAs suspended ) होणार असल्याची माहिती भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी माध्यमांना दिली.
बारा आमदारांच्या निलंबनाबाबत ( Twelve MLAs suspended matter ) सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणी होईल. तेव्हा बाजू मांडली जाईल, असे भाजप आमदार आशिष शेलार यांनी ( Ashish Shelar on 12 MLA Suspension ) सांगितले. तसेच एकाही आमदाराने गैरप्रकार केला नसल्याचा दावा शेलार यांनी केला. विधानभवन परिसरात ते माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा-PM security breach : न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली होणार पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रृटीची चौकशी
न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ
निलंबित बारा आमदारांच्यावतीने आज सहा आमदार विधानभवनात उपस्थित होते. आमदारांचे निलंबन प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. भाजपने पक्षाची भूमिका मांडली आहे. बारा आमदारांपैकी कुठल्याही एकाने गैरप्रकार केला नाही. ज्यामुळे वर्षभराचे निलंबन करावे लागेल.. आम्ही हे मान्य नाही. आमचे मत नोंद करुन घेण्यात आले नाही. त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायाललाय धाव घेतली. ते आमची म्हणणे ऐकतो आहे. सर्वाच्च न्यायालयाने निर्देशानुसार सभागृहात निलंबनाच्या कारवाईवर सुनावणी घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. कारवाईचा कालावधी कमी करणे, किंवा कारवाईला परत घेण्याचे सर्वाधिक सभागृहाला आहेत.परंतु, आज सभागृह नाही. सुनावणी त्यामुळे घेण्यात आली नाही. आता सभागृह अस्तित्वात नसताना सुनावणी किंवा चर्चा सर्वोच्च न्यायलायाच्या निर्देश नुसार उपयोगाचे नाही. ही बाब ठळकपणे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले.