मुंबई - लोकसभेच्या निवडणुकीसाठी मुंबईकरासंह अनेक सेलेब्रिटी उत्साहाने मतदान करत आहेत. मात्र मराठी सिने कलाकार असलेल्या सोनाली नाईकला मतदानाचा हक्क बजावता आला नाही. कारण तिचे उत्तर पश्चिम मतदारसंघातील मतदार यादीत नाव नव्हते.
मतदार यादीत नाव नसल्याचा फटका, सिने कलाकार सोनाली नाईक मतदानापासून वंचित - Mumbai voting
आपल्या एका मताने फरक पडेल, असे अनेकांना वाटत असते. त्यांच्या भावनांचा आदर करून सरकारने काही उपाययोजना कराव्यात, असे सोनाली नाईकने म्हटले.
उत्तर पश्चिम मतदारसंघात असलेल्या बिंबिसार नगर येथील पालिका शाळेत सोनाली नाईक ही मतदान करण्यासाठी आली होती. मात्र मतदान यादीत नाव नसल्याने तिचा हिरमोड झाला. याबाबत ईटीव्ही भारतशी बोलताना सोनाली नाईक म्हणाली, यादीत नाव नसणे, ही जशी सरकारची तशी माझीही चूक आहे.
गेल्यावर्षी माझे मतदार यादीत नाव होते. या वर्षीही यादीत असेल, असे वाटले. मात्र पहिल्यांदाच माझे मतदार यादीत नाव नाही. यामागील कारण माहित नाही. आपल्या एका मताने फरक पडेल, असे अनेकांना वाटत असते. त्यांच्या भावनांचा आदर करून सरकारने काही उपाययोजना कराव्यात, असे सोनालीने म्हटले.