मुंबई :. अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडी यासारख्या एजन्सीच्या माध्यमातून विरोधकांना संपवण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप करत देशातील सर्व विरोधी पक्ष एक होत आहेत. 'नफरत छोडो संविधान बचाओ' अभियान (Quit Hate Save Constitution campaign) देशभर सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेयांची आज नुकतीच भेट Thackeray Support to Quit Hate Save Constitution झाली.
देशात हेट स्पीच -याबाबत पुरोगामी चळवळीतील नेते फिरोज मिठीबोरवाला यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद करताना भेटीबाबत सांगितले - देशात हेट स्पीच अर्थात एका समूहाला लक्ष करीत द्वेष पूर्ण भावना भडकवल्या जातात. हे कृत्य राजकीय फायद्यासाठी केले जात आहे. अशा द्वेषाने दोन धर्म किंवा समूहात सौहार्दाचे नाते बिघडते. यातून समाजात अशांतता माजते. याचा फटका मेहनत करणारे श्रमिक, सामान्य जनता आणि महिला वर्गाला बसतो. जनतेचे मूलभूत जगण्याचे प्रश्न या द्वेष विधानाने बाजूला पडतात. मात्र केंद्र कीवा राज्यशासन यावर अंकुश ठेवत नाही. त्यामुळेच एक समूह दुसऱ्या समूहाच्या जीवावर उठतो इतका द्वेष पसरतो, असे देशातील लोकशाही आणि गांधीवादी तसेच डाव्या समाजवादी पक्ष संघटनांना वाटत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. संविधान बचाओ अभियानाला उद्धव ठाकरे यानी समर्थन दिल्याचं त्यांनी नमूद (Shiv Sena Uddhav Thackeray Support) केलं.